डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

bicholim marigold flower cultivation: डिचोली तालुक्यातील विविध भागांत सध्या झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.
bicholim marigold flower cultivation
bicholim marigold flower cultivationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली तालुक्यातील विविध भागांत सध्या झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. झेंडूच्या मळ्यांमध्ये समाधानकारक बहर आल्याने यंदा दसऱ्याच्या सणाला स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेली झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

मंगळवारी (ता. २०) विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर डिचोलीच्या (Bicholim) बाजारात कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. यंदा झेंडूच्या फुलांचा बहर चांगला असल्याने दसऱ्याच्या काळात ही फुले स्वस्त होण्याची शक्यता आहे. कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेंतर्गत डिचोली आणि साखळी विभागीय कृषी कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात यंदा एकूण ८० हजार चौरस मीटर अर्थात आठ हेक्टर जमिनीवर झेंडूची लागवड केली आहे. बोर्डे, साळ, लाडफे, पिळगाव, मये, सर्वण आणि नानोडा आदी भागांतील ३० हून अधिक शेतकऱ्यांनी, तसेच महिला गटांनी ही लागवड केली आहे. यंदा दसऱ्याला एक टनाहून अधिक स्थानिक झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. रविवारी स्थानिक झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

bicholim marigold flower cultivation
Bicholim: रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग, डिचोलीतील प्रकार; 'सेतू संगम' ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या वाहतुकीस धोका

कर्नाटकातील फुलेही बाजारात

दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी कर्नाटकातून डिचोलीत मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक होते. मंगळवारी दसरा असल्याने कर्नाटकातून डिचोलीत फुलांची आवक सुरू झाली आहे. रविवारी बाजारात कर्नाटकातील झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. फुलांची आवक वाढल्यानंतर त्यांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सध्या झेंडूच्या फुलांचा दर प्रतिकिलो १०० रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com