Porvorim traffic update Dainik Gomantak
गोवा

'पर्वरी, पर्वरी जाना नाही, ट्रॅफिक जाम है!' गाणं गाऊन प्रवाशानं दिला झटका; सोशल मीडियावर Video Viral

Porvorim traffic viral video: गोव्याची राजधानी पणजी आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या म्हापसा शहराला जोडणारा पर्वरी महामार्ग सध्या प्रवाशांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.

Akshata Chhatre

passenger singing song porvorim jam: गोव्याची राजधानी पणजी आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या म्हापसा शहराला जोडणारा पर्वरी महामार्ग सध्या प्रवाशांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, 'दुर्दशा' या एकाच शब्दांत येथील वास्तव मांडता येईल.

रस्त्यांवरील खड्डे, अर्धवट कामे आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे पर्वरीतून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे. केवळ पणजीच नव्हे, तर गोव्याच्या अन्य महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा महामार्ग असूनही प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर गाणं झालं व्हायरल

पर्वरीच्या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या एका त्रस्त प्रवाशाने तर या दयनीय अवस्थेवर एक मिश्किल व्हिडिओ तयार करून आपली व्यथा मांडली आहे. 'परदेसी परदेसी जाना नाही' या प्रसिद्ध हिंदी गाण्याची चाल वापरून त्याने 'पर्वरी, पर्वरी जाना नाही, ट्रॅफिक जाम है, ट्रॅफिक जाम है!' असे गाणे रचले आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रवाशाच्या या मिश्किल टीकेतून पर्वरी महामार्गाची बिकट अवस्था आणि नागरिकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे.

उड्डाणपुलाच्या कामाचा फटका आणि वाहतुकीचे तीनतेरा

पर्वरी येथील 'गिरी ते पर्वरी' या महामार्गावर सध्या उड्डाण पूल उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम भविष्यात वाहतूक सुलभ करेल यात शंका नाही, मात्र सध्या तरी या कामामुळे वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे तीनतेरा वाजले आहेत.

कामासाठी मार्गाचा काही भाग बंद असल्याने आणि अवजड वाहनांची सततची वर्दळ असल्याने या मार्गावर तासन्तास वाहतूक कोंडी रोजची झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या व घरी परतणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे, ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया जात आहे.

धूळ प्रदूषणाने प्रवास झाला असह्य

वाहतूक कोंडीबरोबरच धूळ प्रदूषण ही पर्वरी महामार्गावरील प्रवाशांची दुसरी मोठी समस्या आहे. रस्त्यांच्या कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे या मार्गावरील प्रवास करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना धुळीच्या मोठ्या लोटांचा सामना करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'मै दिल्लीमे था, हमे कुछभी मालूम नहीं'! नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी जामीन मंजूर झाल्यावर संशयिताची प्रतिक्रिया

"नाईटक्लबच्या दुर्घटनेतील बळी ही तर देशाची हानी"! न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केला शोक; ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना केले आवाहन

Drug Menace in Goa: ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’! CM सावंतांचा कडक इशारा; ड्रग्जमुक्त गोवा घडवण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन

Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

SCROLL FOR NEXT