Viral Video: 56व्या 'IFFI'मध्ये 'पुष्पा'ची क्रेझ! 'मै झुकुंगा नहीं साला' म्हणत एन्ट्री, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

IFFI Goa: गोव्यात सध्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) धामधूम सुरू असून देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात सध्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) धामधूम सुरू असून देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लाल गालिचावरून ते विविध चित्रपटांच्या प्रीमियरपर्यंत, संपूर्ण गोवा चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात न्हालेला दिसत आहे. या उत्सवामुळे गोव्याच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय अवतारात दिसून येत आहे. खास अंदाज, डायलॉग स्टाइल आणि चालण्याच्या पद्धतीमुळे उपस्थितांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले असून अनेकांनी त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरलेला नाही.

Viral Video
Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

हा तरुण आपल्या अनोख्या सादरीकरणामुळे महोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुष्पा स्टाईल पोशाख, दाढीचा लुक आणि प्रसिद्ध डायलॉगची नक्कल करत तो महोत्सवाच्या परिसरात सर्वांचे मनोरंजन करताना दिसत आहे. उपस्थितांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक करत सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

IFFI च्या वर्तुळात हा अनोखा प्रकार चर्चेचा विषय ठरला असून महोत्सवाच्या रंगतदार वातावरणात भर घालणारा हा क्षण प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरत आहे.

Viral Video
Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

एकीकडे दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन तर दुसरीकडे अशा अनपेक्षित मनोरंजनामुळे ५६ वा इफ्फी महोत्सव अधिकच गाजत असल्याचे चित्र दिसत आहे. कला, सिनेमा आणि लोकसहभाग यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असल्याने हा महोत्सव यंदा विशेष संस्मरणीय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com