Porvorim Shooting Case Dainik Gomantak
गोवा

Porvorim Shooting Case: पर्वरी गोळीबारप्रकरणी आठवा संशयित मुंबईत जेरबंद; चुनाभट्टीत सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Porvorim Shooting Case: पोलिसांना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सायन-ट्रॉम्बे रोड परिसरात कोरी याच्या हालचालींबाबत तांत्रिक व गुप्त माहिती मिळाली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी येथील ‘हॉटेल निओ मॅजेस्टिक’बाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने आठव्या फरार संशयिताला मुंबईतून अटक केली. दीनानाथ त्रिलोकी कोरी (३२, रा. चिखलवाडी, सुमन नगर, चेंबूर, मुंबई) याला चुनाभट्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सायन-ट्रॉम्बे रोड परिसरात कोरी याच्या हालचालींबाबत तांत्रिक व गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक देखरेखीच्या आधारे त्याचा माग काढला. त्यानंतर चुनाभट्टी परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, कोरी याच्या चौकशीतून गोळीबाराच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन वाहनांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही वाहने शोधून काढून पंचनामा करून जप्त केली.

न्यायवैद्यक पथकाच्या उपस्थितीत वाहनांची जप्ती करण्यात आली असून, त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर आणि पोलीस उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीआय महेश गडेकर, पीएसआय माधव नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बेगूर आणि उद्देश शिरोडकर यांच्या पथकाने कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

SCROLL FOR NEXT