IPL Betting Case Dainik Gomantak
गोवा

आयपीएल बेटिंग करणं पडलं महागात; तिघेजण पर्वरी पोलिसांच्या ताब्यात

आयपीएल (IPL) क्रिकेट मालिकेत ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या टोळीचा पर्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला आयपीएल सुरू होण्याची प्रतीक्षा असते. आयपीएलचे देशभरात अनेक चाहते आहेत. 2022 च्या IPL हंगामाला आता सुरुवात झाली असून सामने चांगलेच रंगात येत आहेत. या सामन्यांदरम्यान अनेकदा अवैध बेटिंग केल्याच्या घटनाही समोर येत असतात. (Porvorim Police have busted an online betting gang in the IPL cricket series)

आयपीएल (IPL) क्रिकेट मालिकेत ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या टोळीचा पर्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिळर्ण येथे एका फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री आरसीबी (Royal Challengers Bangalore) व डीसी (Delhi Capitals) यांच्यात चाललेल्या सामन्यावेळी पर्वरी पोलिसांनी तिथे धाड टाकली. यावेळी राजस्थानचा रहिवासी रोनक माळी, मोहित व्यास व पवन शर्मा या तिघांना अटक अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बेटिंगसाठी लावण्यात आलेला 1.20 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पणजी येथील एका तारांकीत हॉटेलातील कसिनोमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर 'लाईव्ह गेमिंग'वर पणजी पोलिसांचा (Panaji Police) छापा टाकला. पोलिसांनी सुमारे 27 लाख़ रुपये जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर 'लाईव्ह गेमिंग'मध्ये सहभागी असलेल्या 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT