Maharashtra Police Arrested Porvorim goldsmith Dainik Gomantak
गोवा

Maharashtra Police: चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी पर्वरीतील सोनार महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात

दैनिक गोमन्तक

गोव्यात घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी गोवा पोलीस नेहमीच सतर्क असतात. दरम्यान, चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी पर्वरीमधील एका सोनाराला अटक करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सविस्तर प्रकरण असे...

चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी पर्वरीमधून करवीर पोलिस स्टेशन (कोल्हापूर) येथील पोलिसांनी एका सोनाराला अटक केली. त्याला चौकशीसाठी कोल्हापूर येथे घेऊन गेल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली आहे.

पर्वरी येथील पीडीए कॉलनीमध्ये राहणाऱ्या अनुप नार्वेकर याच्यावर चोरीचा माल विकत घेतल्याबद्दल करवीर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी रात्री नार्वेकर याला करवीर पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, राज्यात सोनसाखळ्या हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले असून रविवारी दुपारी केपे येथे प्रवासी बसमध्ये चढताना दोघा प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवून नेण्यात आल्या. दोन्ही मिळून सुमारे अठरा ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्याने केपेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केपे येथे दर रविवारी बाजार भरतो. या बाजाराला ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते. आज दुपारी केपे येथून कावरे पिरला येथे जाणाऱ्या प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केल्याने याचा फायदा घेत चोरट्याने एका महिलेच्या व एका मुलीच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT