Porvorim Flyover News Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडी! पर्वरी उड्डाणपुलाचे काम गतीने; सेगमेंट उभारणीमुळे मार्ग बनला धोकादायक

Porvorim Flyover Updates: गिरी-पर्वरी उड्डाणपुलाचे काम अपेक्षित गतीने पुढे जात असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात होत असलेल्या दुर्लक्षाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Sameer Panditrao

पणजी: गिरी-पर्वरी उड्डाणपुलाचे काम अपेक्षित गतीने पुढे जात असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात होत असलेल्या दुर्लक्षाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मुख्य मार्गावरील खड्डे, धूळ आणि खडी यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. खांब उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता सेगमेंट बसविण्याचे काम सुरू आहे.

मात्र, या कामामुळे सद्यस्थितीत गिरी येथील मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. एकूण ८८ खांबांवर आधारित या भव्य प्रकल्पाचे ८५ खांब पूर्णपणे उभारण्यात आले असून उर्वरित तीन खांबांची उभारणी वेगात सुरू आहे. या खांबांसाठी आवश्यक लोखंडी सळ्यांचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवड्याभरात उर्वरित खांबही उभारले जातील, अशी माहिती मिळाली आहे.

२४ मीटर रुंदीचे सेगमेंट उभारण्याचे काम सुरू असताना, याच मार्गावर वाहतूक सुरू आहे. काम सुरू असताना जर एखादा सेगमेंट अथवा इतर जड साहित्य चुकून खाली पडले, तर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणी वाहतूक पोलिस हजर असणे अत्यंत गरजेचे असताना, सोमवारी (ता.२८) एकही वाहतूक पोलिस तिथे दिसला नाही. शेकडो गाड्या एका वेळी या मार्गावरून धावत असून, एकाच वेळी एकच वाहन सोडण्याची व्यवस्था असूनही वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही ठोस यंत्रणा दिसून आली नाही. यामुळे काही मिनिटांतच ५०० मीटर अंतरावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील वाहतूक गिरी येथील खुरीसमार्गे वळवण्याची विनंती केली होती. मात्र, आतील मार्ग अवजड वाहने सहन करू शकत नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे वाहतूक तशीच सुरू ठेवली आहे. साबांखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहतूक पोलिसांकडे याबाबत चर्चा केली आहे. मात्र, नुकतीच वाहतूक निरीक्षकांची बदली झाल्याने नवीन अधिकाऱ्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्याची गरज आहे. लवकरच यासंदर्भात पुन्हा चर्चा करून योग्य उपाययोजना केल्या जातील.

मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था

उड्डाणपुलाचे काम सुरू असताना मुख्य मार्गावर खड्डे निर्माण होणार याची सर्वांना कल्पना होती. मात्र, खड्ड्यांची वेळोवेळी दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने, गिरी ते कोकेरो जंक्शनदरम्यानचा रस्ता खूप खराब स्थितीत आहे. या मार्गावर दुचाकीस्वारांना वाहन चालवणे मोठे आव्हान ठरत आहे. गिरी ते कोकेरोदरम्यान जागोजागी खड्डे आणि खडी असल्यामुळे अपघाताची देखील शक्यता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: प्रेम व्यक्त करण्यासाठी 'योग्य' दिवस! वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी 'या' वेळी प्रपोज केल्यास होणार फायदा

Missing Womens: 2 ज्येष्ठ महिला अचानक बेपत्ता! मये भागात खळबळ; संशयास्पद ठिकाणी शोधमोहीम सुरु

Bicholim: ..अचानक बँकेचा 'सायरन' वाजू लागला! पोलीस, अग्निशमनची उडाली धावपळ; कारण बघून जीव पडला भांड्यात

Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

SCROLL FOR NEXT