Porvorim Flyover Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: पर्वरी उड्डाण पूल कामाचा अनुपालन अहवाल द्या! गोवा खंडपीठाचे निर्देश, सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी

Porvorim Flyover Construction: पर्वरीतील उड्डाण पूल प्रकल्पाच्या कामावेळी पर्यायी अपूर्ण मार्ग व प्रलंबित रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या अंमलबजावणीतील त्रुटींची दखल खंडपीठाने घेतली.

Sameer Panditrao

Goa Bench About Porvorim Flyover

पणजी: पर्वरीतील उड्डाण पूल प्रकल्पाच्या कामावेळी पर्यायी अपूर्ण मार्ग व प्रलंबित रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या अंमलबजावणीतील त्रुटींची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतली. यावेळी कंत्राटदाराने या त्रुटी प्राधान्यक्रमाने दूर केल्या जातील, अशी हमी दिल्याने त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे खंडपीठाने निर्देश दिले असून त्यावरील सुनावणी १० फेब्रुवारीला ठेवली आहे.

ॲड. मोझेस पिंटो यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने कंत्राटदार आरआरएसएम इन्फ्रा प्रा. लि. कंपनीला अपूर्ण रस्त्यांची कामे, विशेषतः पर्यायी रस्त्यांची सुधारमा व धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आज या कंत्राटदाराने पर्यायी रस्त्यांच्या कामाच्या वेळांची तसेच बॅरिकेड घालणे व पर्यावरणीय उपायांची तपशीलवार माहिती देणारी दोन प्रतिज्ञापत्रे मागील सुनावणीवेळी खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार सादर केली.

बॅरिकेडचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंत्यांच्या पूर्व मंजुरीसह करण्यात येत आहे. उड्डाण पूल काम सुरू असलेल्या दोन्ही बाजूने पर्यायी रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण झाल्यानंतरच नव्या कामाला परवानगी पीडब्ल्यूडीकडून दिली जाते.

कोणती कामे किती वेळेत पूर्ण होतील याचा तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. कंत्राटदारकडून कामाच्या वेळेच्या बंधनाचे पालन केले जात नाही. बॅरिकेड घालण्यापूर्वीच पर्यायी रस्त्यांचे काम हाती घेतले गेले होते व वळणे आहेत तेथे वाहतूक वळवण्यासंदर्भातची माहिती अधिकृतपणे देण्यात आली नसल्याचे याचिकादाराने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अजूनही प्रवाशांना तसेच वाहन चालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशी बाजू याचिकादाराने मांडली.

धूळ रोखण्यासाठी पाच टॅंकर तैनात!

काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन गळतीमुळे रस्त्यांच्या कामात डंबरीकरणात अडथळे येत असल्याने रस्त्यांची स्थिती निकृष्ट झाली असल्याचे कारण कंत्राटदाराने खंडपीठाला दिले. रस्त्यांवरील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पाच पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत व त्याचा पुरावा म्हणून त्यासंदर्भातची काही छायाचित्रेही सादर कंत्राटदाराने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT