Goa Bench Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover Construction: ''झाडांची निर्दयीपणे छाटणी थांबवा, अन्‍यथा...'' हायकोर्टाची कंत्राटदाराला तंबी

Bombay High Court,Goa Bench: पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे धोक्यात असलेल्या सहा जुन्या वटवृक्षांचे स्थानांतर करण्याऐवजी चक्क जेसीबीचा वापर करून त्याच्या फांद्यांची निर्दयीपणे छाटणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे धोक्यात असलेल्या सहा जुन्या वटवृक्षांचे स्थानांतर करण्याऐवजी चक्क जेसीबीचा वापर करून त्याच्या फांद्यांची निर्दयीपणे छाटणी केली. या प्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेत कंत्राटदाराला फटकारले.

पर्वरीतील (Porvorim) उड्डाण पुलाच्या बांधकामावेळी सांगोल्डा जंक्शन ते निओ मॅजेस्टीकपर्यंतच्या अंतरामध्ये सुमारे ६१६ झाडे कापावी लागतील, असा अहवाल तयार केला होता. मात्र, काही लोकांनी जुने वटवृक्ष तोडण्यास विरोध केल्यानंतर त्यापैकी ६ वटवृक्षांचे स्थानांतर, तर ९ वटवृक्षांचे संवर्धन करण्याचे निश्‍चित केले.

वटवृक्षाचे स्थानांतर करण्याऐवजी जेसीबीचा वापर करून त्याच्या फांद्या नृशंसपणे कापल्याचे छायाचित्र खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले, त्यावेळी गोवा खंडपीठाने (Goa Bench) या प्रकाराबाबत आश्‍चर्य तसेच क्रोध व्यक्त केला. प्रतिसाद देत गडकरी यांनी संबंधित यंत्रणेला पाहणीचे आदेश दिले.

या शिष्टमंडळात माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष तथा विद्यमान पंचायत सदस्य कार्तिक कुंडईकर, साईराज अस्नोडकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, समाज कार्यकर्ते संजय बर्डे, शंकर पोळजी, दीपेश नाईक, ॲड. शंकर फडते, सीतेश मोरे यांचा समावेश होता. श्री खाप्रेश्‍‍वर हे जुने देवस्थान असून, ते वाचविण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्‍न केले; पण दखल घेतली नव्‍हती. अखेर आम्‍ही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्‍यांनी आमचे म्हणणे ऐकले आणि सहकार्याचे आश्‍‍वासन दिले. जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर म्हणाले, आम्‍ही निसर्गप्रेमी पुढे आलो आहोत.

...असा चालतो भोंगळ कारभार

१. ३ डिसेंबरला ह्युंडाई शोरूमजवळच्या वडाच्या फांद्या जेसीबीने तोडल्या. याची माहिती गोवा खंडपीठात आज छायाचित्रांसह सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिली.

२. ज्यावेळी फांद्या कापल्या, त्यावेळी वन खात्याचा कोणीही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. कोणत्या वटवृक्षांचे स्थानांतर करायचे आहे, याची माहिती कंत्राटदाराला दिलेली नाही.

३. साबांखाने वटवृक्ष स्थानांतर करण्याचे कंत्राट ‘डॉक्टर ट्री’ कंपनीला दिले आहे. मात्र, तेथे काम सुरू असताना साबांखा किंवा वन खात्याचा कोणीही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता.

४. कंत्राटदार आपल्या मर्जीप्रमाणे या वटवृक्षांच्या फांद्यांची कापणी करत आहे, अशी बाजू ॲड. नॉर्मा आल्वारिस यांनी मांडली.

‘डॉक्टर ट्री’च्या व्यवस्थापकाला आज द्यावे लागणार स्पष्टीकरण

या वटवृक्षाची कापणी न करण्याचे सुनिश्‍चित झाले असतानाही फांद्यांची छाटणी का केली, त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यास कोणी सांगितले, असे प्रश्‍न न्यायालयाने केले. हा प्रकार गंभीर असून त्याच्या चौकशीचे आदेश देऊ. वटवृक्ष स्थानांतराबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का केले नाही? हा वटवृक्ष स्थानांतर करताना तेथे अधिकृत अधिकारी का उपस्थित नव्हते? वटवृक्षांचे संरक्षण करणे शक्य नसल्यास हे बांधकाम बंद करू, असे न्यायाधीशांनी सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT