Minitster Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: पर्वरीकरांसाठी आनंदाची बातमी! उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण होणार, डांबरीकरणास प्रारंभ; मंत्री कामतांची मोठी माहिती

Digambar Kamat Porvorim flyover announcement: यंदाच्या गणेश चतुर्थीत पर्वरीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. साडेपाच किलोमीटरचा उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण केला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: यंदाच्या गणेश चतुर्थीत पर्वरीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. साडेपाच किलोमीटरचा उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण केला जाणार आहे.

या उड्डाणपुलाच्या डांबरीकरणाची सुरुवात पणजीकडील बाजूने सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. कामत यांनी जाहीर केले की, पर्वरी येथील सहापदरी उड्डाण मार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आता गणेश चतुर्थीपर्यंत (सप्टेंबर २०२६ मध्य) ठेवण्यात आले आहे. यापूर्वी निश्चित केलेल्या अंतिम मुदतीपेक्षा हा कालावधी पुढे आणण्यात आला आहे.

निर्धारित कालावधीपूर्वीच काम पूर्ण

सुमारे ४५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गेल्या काही महिन्यांत ५.१५ किमी लांबीच्या या उड्डाण मार्गाच्या कामाला वेग आला असून, यामुळे शासनाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ या आधीच्या लक्ष्याऐवजी आता सप्टेंबरमधील गणेश चतुर्थीपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT