पणजी: पर्वरीत बंद असलेल्या घराचे वीजबिल १० हजार रुपये आल्याचा धक्का सध्या जर्मनीत असलेल्या मॅक्सी कुरैय्या यांना बसला आहे. बेती येथे त्यांचे हे घर असून त्यांचे पालक शेजारील घरात राहतात.
मॅक्सी आणि त्यांच्या पत्नी दीपा यांच्या नावाने हा वीज जोड आहे. त्यांच्या घरात राहत असताना त्यांना ७०० रुपयांच्या दरम्यान वीजबिल येत होते. नंतर ते वाढत गेले. मे मध्ये ७१० रुपये बिल आले होते. जूनमध्ये १ हजार २६५ तर जुलैमध्ये ४ हजार ५६९, ऑगस्टमध्ये ५ हजार २३८ वीजबिल आले.
वीजबिल भरण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांकडे असते. ते शेजारील घरात राहतात. त्यांना घर बंद असताना वाढीव वीजबिल कसे येते याचे आश्चर्य वाटत होते. त्यांनी मुलाच्या नावे वीज खात्याकडे तक्रार केली. त्यानंतर वीज मीटर तपासणी करण्यात आली. त्यात मीटरमध्ये काही दोष आढळला नाही.
या तपासणीनंतर सप्टेंबर महिन्याचे वीजबिल केवळ ५२० रुपये आले आहे. असे असले तरी मधल्या काळात आलेले वाढीव वीजबिल मिळून १० हजार ४९६ रुपये भरा, असा तगादा वीज खात्याने लावला आहे. आताचे वीजबिल भरतो; पण न वापरलेल्या विजेचे बिल आम्ही का भरावे, अशी भूमिका कुरैय्या कुटुंबीयांनी घेतली आहे. यावर आधी वीजबिल भरा मगकाय तो वाद करा, असे वीज खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसा नियमही त्यांना वाचून दाखवण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.