Porvorim Banyan Tree Relocation Risk Dainik Gomantak
गोवा

Porvorim Banyan Tree: 200 वर्षांचे 'आयुष्य' वाचवण्याची शर्थ! स्थलांतराने वडाचे आयुष्य धोक्यात?

200 Year Old Banyan Tree Relocation: झाडाचे स्थानांतर करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तरच हे झाड टिकेल.

Akshata Chhatre

Porvorim Banyan Tree Relocation Risk

पर्वरी: पर्वरीतील २०० वर्ष जुन्या वडाच्या झाडाचे स्थानांतर सुरु झाले आहे. स्थानिकांकडून या स्थनानंतरला बराच विरोध करण्यात आला मात्र पर्वरी उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे झाड हटवण्यात आले आहे. २०० वर्ष जुन्या झाडाचे स्थानांतर करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तरच हे झाड टिकेल असे म्हणत डेनियल डिसोजा नावाच्या एका स्थानिक लँडस्केप डिझायनरने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

सुरुवातीलाच बोलताना डेनियलने त्याला कोणीही बोलावले नाही तर तो स्वतःच्या मर्जीने स्थानांतरच्या जागेवर आल्याचं म्हणालाय. मला झाडांची आवड आहे आणि एखाद्या झाडाचे जीवन वाचवण्यासाठीच मी इथे आलोय असं असं त्याने सांगितलं. डेनियलच्या म्हणण्यानुसार हे झाड जगण्यासाठी किमान दोन भागांमध्ये विभागलं जाणं फारच महत्वाचं होतं.

मुख्यमंत्र्यांनी झाड हटवताना त्याला तीन भागांमध्ये कापण्याचा निर्णय घेतल्याने त्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. हे झाड पुन्हा उभं करण्यासाठी केवळ २.५ मीटर तयार केलेली माती उपयुक्त ठरणार नाही. झाडाची मुळं भर पावसात तग धरायची असतील तर त्यांना टेरेसिंगची गरज आहे. शिवाय त्याने ज्यूट बॅगचा वापर करून झाडाला सतत थंडावा मिळत रहाणं गरजेचं असल्याचं सांगितलंय.

जेवढी जास्त काळजी; तेवढंच त्याला वाचवणं सोपं

गोवा हे छोटं राज्य असल्याने गोव्याजवळ पूर्ण झाडाला स्थानांतरित करता येण्याएवढ्या सुविधा नाहीत आणि म्हणूनच झाड स्थानांतरित करताना त्याचे दोन भागांमध्ये विभाजन करणं महत्वाचं असल्याचं डेनियलने सांगितलं. वडाच्या झाडाची एक फांदी हटल्याने फरक पडणार नाही मात्र संपूर्ण झाड वाचवायचं असेल तर वरील सर्व उपाय करावे लागतील असं तो म्हणालाय.

सध्या राज्यात पावसाचा हंगाम नाही, अत्यंत गरम वातावरणात झाड हटवण्याचा निर्णय चुकीचा आहे. सध्या हे झाड एका रुग्णाप्रमाणे आहे, त्यामुळे आपण त्याची जशी आणि जेवढी जास्त काळजी घेऊ तेवढंच त्याला वाचवणं सोपं जाईल असं डेनियल डिसोजा म्हणालाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT