goan pav Dainik Gomantak
गोवा

Goan Food Culture: गोव्याचा पाव, शेजारील राज्यातही खातोय भाव! म्हापसा बाजारपेठेतून मुंबई, बंगळुरुसह अन्य शहरांत पुरवठा

Goan Bakery Culture: पोर्तुगीजांमुळेच गोव्यात रुजला तो बेकरी व्यवसाय. जसे मासळीशिवाय गोमंतकीयांना जेवण जात नसते, तसेच पावाशिवाय गोवेकरांचा नाश्ता व रात्रीचे जेवण हे अधिकतर अपूर्णच आहे.

Manish Jadhav

म्हापसा: गोवा जवळपास साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या जोखडात होता. परिणामी पोर्तुगीज राजवटीने इथल्या प्रत्येक गोष्टींवर प्रभाव टाकला. इथली भाषा असो, वेशभूषा असो, राहणीमान, व्यवहार किंवा मुख्यतः खानपान. पोर्तुगीजांमुळेच गोव्यात रुजला तो बेकरी व्यवसाय. जसे मासळीशिवाय गोमंतकीयांना जेवण जात नसते, तसेच पावाशिवाय गोवेकरांचा नाश्ता व रात्रीचे जेवण हे अधिकतर अपूर्णच आहे.

गोवेकर सकाळच्या सत्रात चहासोबत पावच पसंत करतात. तसेच रात्रीच्या वेळी ग्रेव्हीसोबत बुडवून खाण्यासाठी पाव किंवा पोळी आदर्श साथी असतो. म्हापसा बाजारपेठेवर पोर्तुगीजकालीन ठसा असून आजही उत्तर असो किंवा दक्षिणेतील लोक हमखास इथल्या बाजारपेठेत बाजारहाटसाठी भेट देतात. येथील विशिष्ट म्हणजे पाव मार्केट. लहानशा शेडमध्ये मागील दोन ते तीन पिढ्या जवळपास बरेच व्यावसायिक दररोज इथे पाव विक्रीचा व्यवसाय करतात.

विशेष म्हणजे, म्हापशातूनच गोव्यातील (Goa) पाव हे शेजारील राज्यातही जातात. विशेषतः मुंबई, बंगळुरु, कर्नाटक, सिंधुदुर्ग व आसपासच्या शेजारील शहरांमध्ये या बाजारपेठेतून पावाचा पुरवठा होता. काही पर्यटक हमखास इथून पाव पार्सल स्वरूपात नेतात.

पारंपरिक पावांची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे. पारंपरिक पाव विविध स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यामध्ये, पाव, उंडो, कात्रो पाव, काकन, पोळी. या पोईच्या दोन प्रकार आहेत. कुंडेची पोळी व गोड पोळी. या पावाची किंमत पाच ते पंधरा रुपये इतकी आहे. पावाच्या आकारानुसार किंमत बदलते.

काकन पाव टिकतो महिनाभर

मुख्यतः पावाची आयुमान कमी असते. साधारण पाव दोन दिवस टिकतो, परंतु काकन पावाला महिनाभर काहीच होत नसते. त्यामुळे पर्यटकांची काकनला जास्त पसंती असते, असे बस्तोडा येथील महिला व्यावसायिक नॅरी डिकॉस्ता यांनी गोमन्तकशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या की, बाजारात पावाला मागणी आहे. कारण स्थानिक लोक ब्रेडपेक्षा पावाला प्राधान्य देतात. सद्यःस्थितीत बिगर गोमंतकीयांमुळे देखील या व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. तरीही सर्व अडचणींवर व स्पर्धेला तोंड देत यात आम्ही टिकून राहण्यात यशस्वी झालो आहोत, असेही त्या म्हणाल्या.

हा व्यवसाय फायदेशीर आहे. यात कठोर मेहनत व परिश्रम लागतात. सकाळी पाव तयार करण्यासाठी आम्ही रात्रभर काम करतो. आवश्यक झोप मिळत नाही, परंतु व्यवसायात टिकून राहण्यासाठी शारीरिक कष्टाशिवाय पर्याय नाही. सध्या पर्यटकांमुळे राज्यात अनेक हॉटेल्स तसेच पुरवठा वाढला आहे. ज्यामुळे पावाची मागणी तिप्पट वाढली आहे. -

नॅरी डिस्कॉस्ता, बस्तोडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT