Portuguese citizenship hidden voter registration Dainik Gomantak
गोवा

Portuguese Citizen: पोर्तुगीज नागरिकत्व लपवले, वास्कोच्या मतदारयादीत नोंदवले नाव; परदेशी महिलेवर गुन्हा दाखल

Portuguese citizenship hidden voter registration: पोर्तुगालचे नागरिकत्व घेतल्याची माहिती लपवून भारतात मतदार म्हणून नाव नोंदवल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: पोर्तुगालचे नागरिकत्व घेतल्याची माहिती लपवून भारतात मतदार म्हणून नाव नोंदवल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेदरम्यान ही बाब उघडकीस आल्याने निवडणूक प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मुरगावचे कार्यकारी दंडाधिकारी, जे वास्को विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणूनही काम पाहतात, यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. तक्रारीनुसार संबंधित महिलेने स्वतःला पात्र मतदार असल्याचे सांगत मतदार नोंदणीसाठी गणना अर्ज सादर केला होता.

तपासादरम्यान मात्र ती महिला पोर्तुगालचे नागरिकत्व घेतलेली असल्याचे उघड झाले. तिच्याकडे पोर्तुगालचा वैध पासपोर्ट असल्याचीही माहिती समोर आली. परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतातील मतदार यादीत नाव नोंदविण्याचा अधिकार राहत नाही.

ही बाब लक्षात आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध फसवणूक व चुकीची माहिती देऊन मतदार म्हणून नोंदणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अशा प्रकारे परदेशी नागरिकत्व घेतलेल्या इतर व्यक्तींनीही मतदार यादीत नाव नोंदविले आहे का, याचीही छाननी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT