Ports Minister Michael Lobo said Covid variant Omicron will impact international tourist footfalls in Goa Dainik Gomantak
गोवा

Omicron Impact: गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येवर होणार परिणाम

कोरोनाच्या प्रादुर्भावाआधी दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला रशियन आणि कझाकस्तान चार्टर कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.

दैनिक गोमन्तक

कोरोनाचा (Covid 19) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) संकटामुळे गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होईल, असे राज्याचे मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी म्हटले आहे. राज्यात पर्यटनाशी संबंधित व्यवसायांची साखळी चालवणारे लोबो यांनी शुक्रवारी असेही सांगितले की गोव्याला पर्यटन (Goa Tourism) क्षेत्रातील पुढील कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी 'वेट अ‍ॅन्ड वॉच' या दृष्टिकोनाचा अवलंब करावा लागेल.

"आम्ही आशा करतो की या प्रकारामुळे लसीकरण झालेल्या लोकांचे नुकसान होणार नाही. चार्टर उड्डाणे रद्द होतील असे संकेत गोव्यात दिसत आहे. कारण चार्टर या महिन्याच्या शेवटी येणार होते आणि असे दिसते की नवीन लसीकरण रद्द केले जाईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो" लोबो म्हणाले.

कोरोनाच्या प्रादुर्भावाआधी दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला रशियन आणि कझाकस्तान चार्टर कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. गेल्या वर्षी रशिया, यूके आणि जर्मनी येथून दरवर्षी सुमारे 900 चार्टर उड्डाणे गोव्याला येत होती, मात्र कोविडमुळे हि विमाने रद्द करण्यात आली आणि ज्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास बंद करण्यात आले होते त्यावेळी गोवा पर्यटनावर त्याचा परिणाम झाला. ज्याचा फटका गोव्यातील पर्यटनाला आणि पर्यटक व्यावसायिकांना बसला. गोव्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये चार्टर फ्लाइटचा मोठा वाटा आहे. 2019 मध्ये जवळपास अर्ध दशलक्ष परदेशी पर्यटक गोव्यात आले होते. यावेळी देखील ओमिक्रॉनच्या प्रभावामुळे गोव्यातील पर्यटनावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम नुकताच सुरू झाला आहे.

"सुरुवातीच्या टप्प्यात थोडासा परिणाम होईल, परंतु आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि जगभरात आणि भारतात काय घडत आहे ते पहावे लागेल. राज्यात काही नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काही विमानसेवाही रद्दीकरण्यात आल्या आहेत. परंतु आम्ही आशा करतो की हा प्रकार गोव्यात पसरणार नाही, त्या शिवाय देशातही या प्रकाराचे पेशंट आढळायला नको," असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT