आता कदंब बसगाडीचा प्रवास होणार ‘हायटेक’

कदंब वाहतूक महामंडळ कात टाकत असून येत्या दोन वर्षांत राज्यभरात केवळ वातानुकूलीत बस धावणार आहेत.
Kadamba bus to be high tech
Kadamba bus to be high techDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कदंब वाहतूक महामंडळ (Kadamba Bus Service) कात टाकत असून येत्या दोन वर्षांत राज्यभरात केवळ वातानुकूलीत बस धावणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून 30 इलेक्ट्रीक बसगाड्या (Electric buses) राज्याच्या विविध भागांत धावत आहेत. सध्या 100 इलेक्ट्रीक बसची मागणी करण्यात आली आहे. ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्याव्यतिरिक्त आणखी 500 इलेक्ट्रीक बसगाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारकडे (Goa Government) महामंडळाने पाठविला आहे.

महामंडळाची स्थापना झाल्यापासून कदंबची ओळख ही त्यांच्या बसेसवरून आहे. पण आठ वर्षांपूर्वीपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या जुन्या बसगाड्या भंगारात जाणार आहेत. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रीक बसगाड्या धावतील. सध्याच्या 30 गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Kadamba bus to be high tech
खरपाल-म्हापसा मार्गावर लाडफेमार्गे 'कदंब' ची बससेवा सुरु

227 मार्गांवर धावतात गाड्या

कदंबच्या बसगाड्या सुमारे 227 मार्गांवर धावतात, त्यातील सर्वाधिक म्हणजे 65 टक्के राज्यांतर्गत आहेत. या सर्व मार्गांवर इलेक्ट्रीकल बस सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे. सहा महिन्‍यांपूर्वी महामंडळाने 30 बसगाड्या खरेदी केल्या होत्या.

यंत्रणा कशी असेल?

कदंब ज्या बसगाड्या खरेदी करणार आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून 45 टक्के अनुदान दिले जात आहे. या बसमध्ये 35 प्रवासी बसू शकतील. बस वातानुकूलीत असून त्यात सीसी टीव्ही कॅमेरे, युएसबी सॉकेट आणि आपत्कालीन बटण असेल.

Kadamba bus to be high tech
‘कदंब’कडे येणार आणखी 100 इलेक्ट्रीक बस

पणजीत 40 चार्जिंग स्टेशन

ही बस 80 टक्के चार्ज केल्‍यास 165 कि. मी., तर 100 टक्के चार्ज केल्यास 200 कि.मी. धावणार आहे. बस चार्जिंग करण्यासाठी 440 मेगा व्हॅट यंत्रणेची गरज असते. ती ग्रामीण भागात नाही. त्यासाठी तुर्तास पणजी स्थानकावरच चार्जिंगची सोय करण्यात येणार आहे.

कदंब हे नागरी सेवा पुरविणारे महामंडळ आहे. नफ्या-तोट्याचा विचार न करता नागरिकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि ग्रामीण भागातील संस्कृती रक्षण असा दुहेरी हेतू समोर ठेवला आहे. त्यासाठी 100 बसची मागणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 500 बस खरेदीचा प्रस्ताव आहे.

- संजय घाटे, व्यवस्थापक कदंब

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com