Portion of parapet falls on car parked in Vasco Dainik Gomantak
गोवा

दैव बलवत्तर म्हणून 'त्या' महिलेचा जीव बचावला

वास्कोत एका इमारतीचा काही भाग शनिवारी खाली कारवर कोसळून अपघात झाला. मात्र सुदैवाने या कारमधील महिला दुर्घटनेतून सुखरुप बचावली आहे.

आदित्य जोशी

वास्को : वास्कोत एका इमारतीचा काही भाग शनिवारी खाली कोसळला. इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचं या अपघातात मोठं नुकसान झालं. मात्र सुदैवाने या कारमधील महिला दुर्घटनेतून सुखरुप बचावली आहे.

पावसामुळे गोव्यात अनेक ठिकाणी पडझड सुरु आहे. काही ठिकाणी घरांवर झाडं पडून नुकसान झालं आहे, तर काही ठिकाणी दरड खाली आल्यामुळे लोकांपुढे संकट उभं ठाकलं आहे. यातच आज शनिवारी दुपारी वास्कोत इमारतीचा कमकुवत झालेला काही भाग खाली कोसळला. हा भाग इमारतीखाली पार्क केलेल्या कारवर कोसळून कारचं मोठं नुकसान झालं. मात्र सुदैवाने या कारमधील महिला बचावली आहे.

दरम्यान या इमारतीच्या मालकाच्या प्रतिनिधींनी इमारत परिसराची पाहणी केली. यात इमारत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल मुरगाव पालिकेने दिला आहे. तसंच येथे राहणाऱ्यांना इमारत खाली करण्याची नोटीसही बजावली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई पालिकेकडून करण्यात आलेली नाही. इमारत धोकादायक असल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT