Pramod Sawant Swearing-In Ceremony Twitter /@ANI
गोवा

गोव्याच्या मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर

गृह आणि वित्त खाती मुख्यमंत्र्यांकडेच, तर विश्वजीत राणेंकडे आरोग्य खातं कायम

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह, वित्त या महत्त्वाच्या खात्यांसह कार्मिक, दक्षता आणि राजभाषा खात्यांचा पदभार असेल तर विश्वजीत राणेंकडे आरोग्य, नगरविकास, नगरनियोजन, महिला आणि बालकल्याण, वन खात्यांचा पदभार असेल.

मॉविन गुदिन्हो यांच्याकडे वाहतूक, उद्योग, पंयाचत खात्यांचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर फोंड्याचे (Ponda) आमदार रवी नाईक यांच्याकडे कृषी खातं, हस्तकला आणि नागरी पुरवठा या मंत्रालयांचा पदभार असेल. नीलेश काब्राल यांच्याकडे विधीमंडळ कामकाज, पर्यावरण, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार असेल.

सुभाष शिरोडकर यांच्याकडे सहकार खात्यासह प्रोव्हेदोरिया, जलस्त्रोत खात्यांचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर पर्वरीचे (Porvorim) आमदार रोहन खंवटे यांच्याकडे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान यासह छपाई आणि स्टेशनरी खाती असतील. गोविंद गावडे यांच्याकडे क्रीडा, कला आणि संस्कृती यासह ग्रामीण विकास खात्याचा पदभार असेल. बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांना मागील सरकारमध्ये जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे असणाऱ्या महसूल, कामगार खात्यांसह कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहे.

गोव्याच्या मंत्रिमंडळाचं सविस्तर खातेवाटप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

1. गृह

2. वित्त

3. कार्मिक

4. दक्षता

5. राजभाषा

मंत्रिमंडळातील रिक्त खात्यांचा पदभारही मुख्यमंत्र्यांकडेच असेल

विश्वजीत राणे

1. आरोग्य

2. नगरविकास

3. नगरनियोजन

4. महिला आणि बालविकास

5. वन

मॉविन गुदिन्हो

1. वाहतूक

2. उद्योग

3. पंचायत

4. शिष्टाचार

रवी नाईक

1. कृषी

2. हस्तकला

3. नागरी पुरवठा

नीलेश काब्राल

1. विधीमंडळ कामकाज

2. पर्यावरण

3. कायदा आणि सुव्यवस्था

4. सार्वजनिक बांधकाम

सुभाष शिरोडकर

1. जलस्त्रोत

2. सहकार

3. प्रोव्हेदोरिया

रोहन खंवटे

1. पर्यटन

2. माहिती आणि तंत्रज्ञान

3. छपाई आणि स्टेशनरी

गोविंद गावडे

1. क्रीडा

2. कला आणि संस्कृती

3. ग्रामीण विकास

बाबूश मोन्सेरात

1. महसूल

2. कामगार

3. कचरा व्यवस्थापन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT