Fontainhas Instagram
गोवा

Goa Fontainhas: पणजीतील फोन्तेन्हासची जगाला मोहिनी, अमेरिकेतील ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’चे सर्वेक्षण

Goa Fontainhas: एकमजली काही इमारती मोडकळीस आल्या असल्‍या तरी त्या अजूनही आपले आकर्षण टिकवून आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fontainhas

राजधानी पणजीतील फोन्‍तेन्‍हास आणि मळा परिसराला दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. हा परिसर पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरला आहे. अमेरिकेतील ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’ या मासिकाने अलीकडेच जगातील ज्‍या अकरा सुंदर परिसरांची यादी जाहीर केली, त्‍यात फोन्‍तेन्‍हासला सहावा नंबर मिळाला आहे.

फोन्‍तेन्‍हासमधील पोर्तुगीजकालीन घरांची रचना, रंगसंगती, स्थापत्यकला, अरुंद पण स्‍वच्‍छ रस्ते हे पर्यटकांना भुरळ पाडतात. त्यामुळेच पर्यटक आठवण म्हणून तेथे सेल्फी तसेच छायाचित्रे घेताना दिसतात. गेल्या काही वर्षांत या परिसराला भेट

दरवर्षी घरांना केली जाते रंगरंगोटी

फोन्तेन्हास हे नाव ‘फोन्ते फिनिक्स’ (फिनिक्सचे कारंजे) या शब्दावरून पडले. पोर्तुगीजकाळात घराला दरवर्षी नवीन रंग देण्याचा नियम होता आणि तो फोन्तेन्हासमध्ये राहणारे लोक आजही पाळतात. त्यामुळेच दरवर्षी हा परिसर रंगरंगोटी केलेला दिसून येतो.

तसेच दारासमोर फुलझाडे लावलेली दिसतात. या ठिकाणच्‍या काही घरांवरील नावे अजूनही पोर्तुगीज भाषेतील आहेत. एकमजली काही इमारती मोडकळीस आल्या असल्‍या तरी त्या अजूनही आपले आकर्षण टिकवून आहेत.

देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. या सर्व कारणांमुळेच फोन्तेन्हास हा जगातील सहावा सुंदर परिसर ठरला आहे.

ही ११ ठिकाणे ठरली सर्वांगसुंदर

‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’ या मासिकाने जाहीर केलेल्या नेबरहूड परिसरामध्ये लुबेकर अलटस्टाडीट (जर्मनी), सोहो (लंडन), सिदी बोऊ सॅड व्हिलेज (ट्युनिसीया), हिगाशियामा (जपान), गोथिक क्वार्टर (स्पेन), फोन्‍तेन्हास (पणजी-गोवा, भारत), मॉँतमार्ट्रे (फ्रान्स), कार्मेल बाय द सी (कॅलिफोर्निया), कास्को व्हिईजो (पनामा), केर्रो अल्ग्रे (चिली) व ओल्ड टाऊन चेफचाऊन (मोरोक्को) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT