Zuarinagar: झुआरीनगर-बिर्ला येथे बारमधील हाणामारीमध्ये युवक गंभीर : माजी पंचाला अटक

Zuarinagar Crime News: झुआरीनगर-बिर्ला येथे एका बारमध्ये मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली.
Dance Bar Worker Assaulted
Dance Bar Worker Assaulted Dainik Gomantak

Zuarinagar, Goa

झुआरीनगर-बिर्ला येथे एका बारमध्ये झालेल्या हाणामारीत मंजुनाथ नवली हा युवक गंभीर जखमी झाला. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी सांकवाळचा माजी पंच रंगप्पा कमल याला अटक केली असून अन्य तिघेजण फरार आहेत. वेर्णा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

झुआरीनगर-बिर्ला येथे एका बारमध्ये मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. मंजुनाथ नवली हा बारमध्ये बसला होता. काही वेळाने चौघेजण तेथे आले आणि त्यांनी मंजुनाथला मारहाण करण्यास सुरवात केली. एकाने त्याच्यावर चाकूने वार केला.

संशयिताला पोलिस कोठडी

वेर्णा पोलिसांनी या मारहाण प्रकरणात गुंतलेला सांकवाळचा माजी पंच रंगप्पा कमल याला अटक केली असून आज (बुधवारी) त्याला प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली. या प्रकरणात गुंतलेले शिवानंद हिरे गावडर, देवराज चिमल, दीपक हिरेमठ हे संशयित फरार असून वेर्णा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com