Dog Vaccination Dainik Gomantak
गोवा

Dog Vaccination In Goa: पाळीव कुत्र्यांच्या लसीकरणाला अल्‍प प्रतिसाद

Dog Vaccination In Goa: विद्यार्थ्यांतर्फे जागृती : लसीकरण व मायक्रोचिप बसविण्याच्या उपक्रमाचा समारोप

दैनिक गोमन्तक

Dog Vaccination In Goa: ‘रेबिजमुक्त गोवा‘ या उपक्रमानिमित्त पाळीव कुत्र्यांच्या लसीकरण मोहिमेला पणजी परिसरात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. मात्र इतर ठिकाणी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती ‘मिशन रेबीज’चे संचालक डॉ. मुरुगन अप्पूपिल्लई यांनी ‘गोमन्कत’शी बोलताना दिली.

लसीकरण आणि कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप बसविण्याच्या उपक्रमाचा समारोप आज शनिवारी मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात झाला. याप्रसंगी डॉ. प्रकाश कोरगावकर, अभिनेते तपन आचार्य, सोनाली नागवेकर, डॉ. श्‍वेता सरदेसाई यांची उपस्थिती होती. मात्र महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त क्लेन मेदेरा यांची अनुपस्थिती होती.

डॉ. अप्पूपिल्लई म्हणाले, देशात रेबिजमुळे दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू होतो. ही संख्या जगात सर्वात जास्त आहे. भारत हा रेबिजचा हॉटस्पॉट आहे. गोवा रेबिजमुक्त झाला असे म्हटले असले तरी वेळोवेळी लसीकरण करणे गरजेचे आहे. राज्‍यातील इतर शहरांत केलेल्या लसीकरण मोहिमेस आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु पणजी शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

पाळीव कुत्र्यांना लसीकरणासाठी आणण्यात लोक का घाबरतात ते माहीत नाही. वास्‍तविक हा उपक्रम मोफत आहे. राज्याच्या सीमेलगत असलेल्या पेडणे, सत्तरी,

डिचोली, धारबांदोडा, सांगे आणि काणकोण या तालुक्यांमध्‍ये रेबिजमुक्त लसीकरणाचा उपक्रम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंसक जातीच्‍या कुत्र्यांवर बंदी कधी?

एक महिन्यापूर्वी ताळगावात रॉटवेलर जातीच्या पाळीव कुत्र्याने दोन बालकांचा चावा घेतला. या घटनेत एक मुलगा गंभीर जखी झाला. त्यानंतर कुत्र्याच्या मालकाला अटकही झाली होती. ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंसक जातीच्या कुत्र्यांवर बंदी घातली जाईल, असे सांगितले होते. मात्र अशा बंदीबाबत अद्याप कोणत्याही हालचाली सरकारी पातळीवर झालेल्या दिसत नाहीत, असे डॉ. प्रकाश कोरगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT