Pooja Naik Judicial Custody Dainik Gomantak
गोवा

Cash for Job Scam: 'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईकला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी !

Pooja Naik Judicial Custody: 'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Manish Jadhav

'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पाच दिवसांच्या कोठडीचा रिमांड संपल्यानंतर सोमवारी (4 नोव्हेंबर) पूजा हिला डिचोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून रिमांड मंजूर करण्यात आला.

पूजाला दिलासा नाहीच!

सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने 20 हजार रुपयांची हमी आणि अन्य अटींवर सशर्त जामीन मंजूर केला होता, मात्र या अटींची पूर्तता करेपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश देखील या प्रकरणात समावेश उघड झाल्याने काही मंत्र्यांची देखील नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांना गंडा घातल्याच्या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिच्या ताब्यातील चार महागड्या कारगाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच ती राहत असलेल्या ओल्ड गोव्यातील पॉश कॉलनीमध्ये जाऊन चौकशी सुरु केली आहे. एकदम साधी राहणीमान आणि पतीचा मासळी विक्रीचा व्यवसाय असूनसुद्धा तिच्याकडे चार प्लॅट असल्याची बाब समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

FC Goa: आज मोठी लढत! एफसी गोवा आणि पंजाब भिडणार

Suchana Seth Case: आरोप निश्चित! पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या 'सूचना'विरोधात चालणार खटला

Goa Crime: संशयित कॉन्स्टेबलचा भाऊ अजूनही फरार! दोघी बहिणींना न्यायालयीन कोठडी; 'तो' दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT