Goa Crime: संशयित पूजा ऊर्फ प्रिया यादव हिने गोव्यात असताना वापरात असलेले सर्व मोबाईलची सिमकार्डे नष्ट करून टाकली होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.
Pooja YadavDainik Gomantak

Cash For Job Scam: गायब 'पूजाला' तंत्रज्ञानाच्या मदतीने अटक! डिचोली पोलिसांचा यशस्वी प्रयत्न

Goa Crime: संशयित पूजा ऊर्फ प्रिया यादव हिने गोव्यात असताना वापरात असलेले सर्व मोबाईलची सिमकार्डे नष्ट करून टाकली होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.
Published on

Goa Cash For Job Scam Pooja Yadav Case

पणजी: सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून कोट्यवधींहून अधिक रुपयांचा गंडा घातलेल्या पूजा ऊर्फ प्रिया यादव हिने तिच्याविरुद्ध तक्रारी दाखल होत असल्याची चाहूल लागताच ती गोव्यातून गायब झाली होती व तिने मोबाईल सिमकार्डे नष्ट केली होती. ती कोल्हापूर येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होती. तिच्या मोबाईल संचच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून शिताफीने तिला अटक करण्यात आली.

डिचोलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारिपदाचा ताबा घेतल्यानंतर जीवबा दळवी यांनी सध्या सुरू असलेल्या सरकारी नोकरी विक्री प्रकरणाच्या तपासकामास सुरवात करून गेले दोन महिने गायब असलेल्या संशयित पूजा ऊर्फ प्रिया यादव हिचा शोध लावण्यात यश मिळवले. पूजा हिने ज्या लोकांकडून सरकारी नोकरी देण्यासाठी पैसे घेतले होते त्यांनी नोकरी द्या अन्यथा पैसे परत करा असा ससेमिरा लावला होता. तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचीही तयारी काहींनी केली होती. त्यामुळे पैसे परत करण्याचे खोटे आश्‍वासन देऊन ती गोव्यातूनच पसार झाली होती.

Goa Crime: संशयित पूजा ऊर्फ प्रिया यादव हिने गोव्यात असताना वापरात असलेले सर्व मोबाईलची सिमकार्डे नष्ट करून टाकली होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.
Goa Crime: कॉन्‍स्‍टेबल आत्‍महत्‍या प्रकरण! ‘त्या’ दोन महिला पोलिसांना अटक; प्रेमप्रकरणावरुन सतावणूकीचे सापडले 'कॉल्स'

पोलिसांचा पाठलाग ठरला महत्त्वाचा

संशयित पूजा ऊर्फ प्रिया यादव हिने गोव्यात असताना वापरात असलेले सर्व मोबाईलची सिमकार्डे नष्ट करून टाकली होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.

काही दिवसांनी तिने तिच्याकडे असलेल्या एका मोबाईल संचमध्ये नवीन सिमकार्ड घातले व कॉल केला होता. त्यानंतर तिने हा मोबाईल पुन्हा बंद करून ठेवला होता.

तिचे सर्व मोबाईल्स व सिमकार्ड सर्वेलन्सवर होते. तिने केलेला कॉल हा कोल्हापूर येथून आल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली होती.

कोल्हापूर येथील त्या परिसरात डिचोलीचे पोलिस पथक पाठवून तिच्या छायाचित्रावरून शोध घेत होते. अखेर ती राहत असलेल्या भाडेपट्टीवरील खोलीची माहिती मिळवून तिला ताब्यात घेण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com