Suchana Seth Case: आरोप निश्चित! पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या 'सूचना'विरोधात चालणार खटला

Goa Murder Case: कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन सूचना सेठ पलायन करण्याच्या प्रयत्नात होती.
Suchana Seth Case: आरोप निश्चित! पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या 'सूचना'विरोधात चालणार खटला
Suchana Seth CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोटच्या मुलाची हत्या करण्याच्या आरोपात अटकेत असणारी उच्च शिक्षित सूचना सेठविरोधात पणजी बाल न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. मुलाची हत्या आणि याप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका न्यायालयाने सेठवर ठेवला आहे.

यामुळे सूचनाला मुलाचा खून केल्याप्रकरणी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सूचनाने मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती.

बंगळुरु येथील एका एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ असणारी सूचना सेठने जानेवारीच्या सुरुवातीला पोटच्या मुलाचा खून केला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन कर्नाटकच्या दिशेने जाताना मोठ्या शिताफिने पोलिसांनी तिला पकडले होते.

सूचनाचे पतीसबोत वाद होते, वादातून दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. त्यात मुलाच्या कस्टडीवरुन सूचना चिंतेत असायची. मुलाचा खून करण्यापूर्वी ती गोव्यातील कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आली होती. एक दिवस राहिल्यानंतर तिने मुलाचा खून केल्याचे उघडकीस आले. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन ती पलायन करण्याच्या प्रयत्नात होती.

दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये सापडलेले रक्ताचे डाग आणि हॉटेलमधील कामगारांना आलेल्या संशयावरुन सूचनाने केलेले कृत्य उघडकीस आले होते.

Suchana Seth Case: आरोप निश्चित! पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या 'सूचना'विरोधात चालणार खटला
Mumbai Politics: बांग्लादेश, म्यानमारमधील स्थलांतरित मुंबईचे राजकारण करतायेत प्रभावित; TISS च्या अभ्यासातून दावा

सूचनाची मानसिक स्थिती देखील ठिक नसल्याचा दावा करण्यात आला. पण, दोनवेळा केलेल्या मानसिक चाचणीतून तिची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे अहवालातून समोर आले. अखेर, दहा महिन्यानंतर सूचनाविरोधात पणजी बाल न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. मुलाची हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असे आरोप सूचनाविरोधात ठेवण्यात आले आहेत. सूचनाला आता या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com