FC Goa: आज मोठी लढत! एफसी गोवा आणि पंजाब भिडणार

ISL 2024-25: आयएसएल स्पर्धेतील पाचपैकी चार लढती जिंकलेला पंजाब एफसी संघ आक्रमक खेळासाठी ओळखला जात असून त्याच शैलीच्या बळावर गोव्यातही विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करण्याचा नवी दिल्लीस्थित संघाचा मनोदय आहे.
FC Goa Vs Punjab FC
FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League 2024 25 FC Goa Vs Punjab

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या अग्रस्थानी असलेल्या बंगळूर एफसीला एकतर्फी नमविल्यानंतर एफसी गोवाचा आतमविश्वास बळावला आहे. त्या जोरावर त्यांची नजर आणखी एका विजयावर एकवटली असून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी (ता. ६) आक्रमक शैलीच्या पंजाब एफसीविरुद्ध लढत होईल.

आयएसएल स्पर्धेतील पाचपैकी चार लढती जिंकलेला पंजाब एफसी संघ आक्रमक खेळासाठी ओळखला जात असून त्याच शैलीच्या बळावर गोव्यातही विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करण्याचा नवी दिल्लीस्थित संघाचा मनोदय आहे. सध्या पंजाब एफसीचे पाच लढतीतून चार विजय व एका पराभवासह १२ गुण असून ते गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सलग तीन सामने जिंकले आहेत.

एफसी गोवाने सात लढतीत दोन विजय, तीन बरोबरी व दोन पराभवांसह नऊ गुणांची कमाई केली असून ते सध्या सातव्या क्रमांकावर आहेत. मागील लढतीतील जोश कायम राखल्यास गोव्यातील संघ पूर्ण गुणांसह गुणतक्त्यात उसळी घेऊ शकतो. सहा सामने खेळल्यानंतर त्यांनी स्पर्धेत प्रथमच क्लीन शीट राखताना बंगळूरवर वर्चस्व राखले होते.

बंगळूर एफसीविरुद्ध खेळलेल्या संघात काही बदल अपेक्षित असल्याचे सुतोवाच एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. बोर्हा हेर्रेरा, रॉलिन बोर्जिस व उदांता सिंग या लढतीसाठी उपलब्ध नसतील; पण त्यांची जागा घेणारे खेळाडू संघात असल्याचे त्यांनी नमूद केले. दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन केलेला अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याचे मार्केझ यांनी कौतुक केले.

खडतर आव्हान उभे करणार

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ बंगळूरवरील ३-० या एकतर्फी विजयाने सुखावले आहेत. त्यांनी सांगितले, की ‘निश्चितच संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. पंजाबविरुद्ध लढत कठीण असली, तरी आम्हीही त्यांच्यासमोर खडतर आव्हान उभे करू. त्यांच्यासाठीही सामना सोपा नसेल. विजयाचे पूर्ण गुण मिळविल्यास आम्ही गुणतक्त्यात वरच्या क्रमांकावर उडी घेऊ. तेच लक्ष्य आहे.’

FC Goa Vs Punjab FC
Goa Weather: गोव्यात नोव्हेंबरमध्ये 'घामाच्या धारा'! तापमान 33.5 अंशांवर; थंडी गेली कुठे?

प्ले-ऑफ पात्रतेचा निर्धार

मंगळवारी पत्रकार परिषदेत पंजाब एफसीचे मुख्य प्रशिक्षक पानागिओतिस दिल्मपेरिस यांनी सांगितले, की ‘फुटबॉल विकास हे आमच्या संघाचे तत्त्वज्ञान आहे. आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठण्याचा आमचा निर्धार असून त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंतच्या कामगिरीवर मी खूष असून गोव्यातही विजय हेच लक्ष्य आहे. आम्ही त्यांच्या (एफसी गोवा) शैलीसमोर दबणार नाही, तर आम्ही त्यांना आमच्या शैलीनुसार खेळण्यास भाग पाडू. विजय हीच आमची मानसिकता आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com