Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Goa Crime: नोकरीचे आमिष दाखवून 14 लाख उकळले! महिलेच्या आवळल्या मुसक्या; आणखी लोकांना फसवल्याची शक्यता

Goa Fraud Case: नोकरीचे आमिष दाखवून प्रियोळ येथील एकाला १४ लाख रुपयांना गंडवल्याप्रकरणी जुने गोवे येथील श्रावणी ऊर्फ पूजा नाईक ऊर्फ रुपा पालकर (३९) हिला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Marol Police Nab Woman for Job Scam For 14 Lakhs

फोंडा: नोकरीचे आमिष दाखवून प्रियोळ येथील एकाला १४ लाख रुपयांना गंडवल्याप्रकरणी जुने गोवे येथील श्रावणी ऊर्फ पूजा नाईक ऊर्फ रुपा पालकर (३९) हिला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित श्रावणी हिने अशाच प्रकारे इतर काही युवकांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने म्हार्दोळ पोलिस अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे श्रावणी ही पर्वरी येथील सचिवालयात नोकरीला आहे.

प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांच्या दोन मुलांना सरकारी नोकरीला लावते असे सांगून त्‍यांच्‍याकडून श्रावणीने १४ लाख उकळले होते. हे प्रकरण २०२१ मध्ये घडले होते. पैसे देऊन बराच काळ लोटला तरी नोकरीचा पत्ता नसल्याने गावडे यांनी श्रावणीकडे पैशांची विचारणा केली असता तिने हात वर केले. शेवटी तिच्‍याविरोधात पोलिसांत तक्रार करण्‍यात आली. आणखी काही लोकांना संशयित महिलेने गंडावल्‍याची शक्‍यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa Live Updates: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

SCROLL FOR NEXT