Pooja Naik  Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Pooja Naik: सरकारी नोकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने अनेकांना गंडा घालण्‍याचा आरोप असलेली ठकसेन पूजा नाईक हिने येथील काही वकिलांनाही गंडा घातला असल्‍याचे उघड झाले आहे.

Manish Jadhav

मडगाव: सरकारी नोकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने अनेकांना गंडा घालण्‍याचा आरोप असलेली ठकसेन पूजा नाईक हिने येथील काही वकिलांनाही गंडा घातला असल्‍याचे उघड झाले आहे. मडगावातील एका महिला वकिलाने स्‍वत:ला मामलेदाराची नोकरी मिळावी म्‍हणून पूजा नाईक हिला 16 लाख रुपये दिले होते, असे सांगितले.

वकिलांना गंडा

मडगावातील ज्‍येष्‍ठ वकील राधाराव ग्रासियस यांनी गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात बोलताना वरील माहिती दिली. ते म्‍हणाले की, फक्‍त ही एकच वकील महिला गंडवली गेलेली नाही तर अनेक वकिलांना असा फटका बसला आहे. फक्‍त आपले नाव खराब होऊ नये यासाठी या प्रकरणी अजून कोणी पोलिस तक्रार केलेली नाही. ‘गोमन्‍तक’चे ब्यूरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ती गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या फेसबुक, यू-ट्यूब आणि इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

नव-नवे खुलासे

पूजा नाईक प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. यासंबधित अनेकांची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश देखील या प्रकरणात समावेश उघड झाल्याने काही मंत्र्यांची देखील नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

SCROLL FOR NEXT