Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda News : बेरोजगारीमुळे युवावर्ग वैफल्यग्रस्त : विरियातो फर्नांडिस

Ponda News : फोंड्यात आज (बुधवारी) काँग्रेस पक्षाचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी आपल्या समर्थकांसमवेत येऊन मतदारांशी संवाद साधला. सुरुवातीला बसस्थानकावरील झरेश्‍वर देवाचे आशीर्वाद घेऊन फोंड्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त झालेल्या गोव्याला विशेष दर्जा देण्याची आवश्‍यकता असून आपण त्याच संदर्भात बोललो होतो, असे सांगून भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे युवावर्ग वैफल्यग्रस्त झाला आहे, महागाई प्रचंड वाढल्याने आता मतदारांनी गॅस सिलिंडरला नमस्कार करूनच मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी फोंड्यातील प्रचारावेळी केले.

फोंड्यात आज (बुधवारी) काँग्रेस पक्षाचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी आपल्या समर्थकांसमवेत येऊन मतदारांशी संवाद साधला. सुरुवातीला बसस्थानकावरील झरेश्‍वर देवाचे आशीर्वाद घेऊन फोंड्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी फोंड्यातील काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर, गोवा फॉरवॉर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, आम आदमी पक्षाचे ॲड. सुरेल तिळवे, काँग्रेसचे पदाधिकारी गिरिश चोडणकर तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरियातो फर्नांडिस म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला विविध क्षेत्रात आलेले अपयश झाकण्यासाठीच आता विविध क्लृप्त्या शोधून विरोधकांना हैराण करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कला अकादमीचे छत कोसळल्यानंतर यावर चर्चा होऊ नये यासाठी भाजपाकडून सोयीस्करपणे लोकांचे मन दुसरीकडे वळवले जात आहे.

राज्यातील बेरोजगारी, महागाई, बंद खाणींचा प्रश्‍न, कोळसा प्रकरण, म्हादई प्रश्‍न असे अनेक प्रश्‍न आणि समस्या भेडसावत असल्या तरी भाजपकडून धर्माच्या नावावर मतांचा जोगवा मागितला जातो. सर्वधर्मसमभाव विसरून भाजपाने एकमेकांप्रती द्वेष आणि कलह निर्माण केला आहे, त्यामुळे यावेळेला फक्त आणि फक्त काँग्रेसलाच निवडून द्या, असे आवाहन विरियातो फर्नांडिस यांनी केले.

राजेश वेरेकर म्हणाले, विरियातो फर्नांडिस हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत. दक्षिण गोव्यातील विविध समस्या सोडवण्याबरोबरच राज्याच्या विकासाकडे ते लक्ष देणार असून फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात आवश्‍यक सुविधा सर्वप्रथम उपलब्ध करून देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गोवा फॉरवॉर्डचे दुर्गादास कामत म्हणाले की, भाजपा सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून यावेळेला काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस निवडून येणार म्हणून भाजपाच्या नेत्यांनी धास्ती घेतली आहे. फोंडा तालुक्यात सर्वाधिक मते मिळवून देण्यासाठी गोवा फॉरवॉर्ड प्रयत्न करणार असल्याचे कामत म्हणाले.

आपचे सुरेल तिळवे म्हणाले, कारगील लढाईत असलेले विरियातो फर्नांडिस यांनी देशासाठी काम केले आहे. त्यांच्यावर नाहक आरोप करून मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रचार भाजपाकडून केला जात असून विरियातो फर्नांडिस हेच निवडून येतील, अशी ग्वाही तिळवे यांनी दिली. गिरिश चोडणकर यांनी भाजपाने कितीही तक्रारी केल्या तरी त्याला कोणतीच किंमत नसून जे चांगले आणि सत्य आहे, तेच मतदार स्विकारतील, असे सांगितले.

धार्मिक स्थळांना भेट

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सुरवातीला फोंड्यातील झरेश्‍वर देवस्थान, त्यानंतर कार्मेल कपेल तसेच कुर्टीतील मशिदीला भेट दिली. तेथील कार्यकर्त्यांनी विरियातो फर्नांडिस यांचे स्वागत केले. फोंडा बसस्थानक तसेच फोंडा बाजार व इतर ठिकाणी व्यापारी, विक्रेते व सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी विरियातो फर्नांडिस यांनी घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT