Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda News : कामगार मिळेनात; घरांची शाकारणी करायची कशी ?

Ponda News : एक काळ होता, ज्यावेळेला फोंडा तालुक्यात बहुतांश घरे ही कौलारूच होती. किंचित कुठे तरी स्लॅब टाकलेली घरे दिसायची; पण नंतरचा काळ बदलत गेला आणि आता कौलारू घरांचे रूपांतर स्लॅबच्या घरात होऊ लागले आहे; पण हे प्रमाण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, कौलारू घर असलेल्यांचे सध्या वांदे होत आहेत. कामगारच मिळत नसल्याने घरे शाकारावी कशी, हा मोठा प्रश्‍न या घरांच्या मालकांसमोर उभा असून अव्वाच्या सव्वा मजुरी देऊन कामगारांना बोलावून आणावे लागते; पण ते काम व्यवस्थित करतीलच की नाही, याची शाश्‍वती नसते, त्यामुळे प्लास्टिकचे आवरण घालून घर कसेबसे शाकारावे लागते, अशा प्रतिक्रिया फोंडा तालुक्यातील बहुतांश घरमालकांनी व्यक्त केल्या आहेत.

एक काळ होता, ज्यावेळेला फोंडा तालुक्यात बहुतांश घरे ही कौलारूच होती. किंचित कुठे तरी स्लॅब टाकलेली घरे दिसायची; पण नंतरचा काळ बदलत गेला आणि आता कौलारू घरांचे रूपांतर स्लॅबच्या घरात होऊ लागले आहे; पण हे प्रमाण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही.

ज्यांच्या खिशात पैसा आहे, त्यांनी आपल्या घराची व्यवस्थित बांधणी केली; पण ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते त्यांना नवीन घरांची बांधणी करणे कठीण होऊन बसते. नेमकी हीच स्थिती आज फोंडा तालुक्यातील कौलारू घरे असलेल्यांची झाली आहे.

घर शाकारण्यासाठी कामगार किमान एक हजार रुपये मजुरी मागतात आणि ही कामे करण्यास गोमंतकीय कामगार मिळत नाहीत. परप्रांतीय मजुरांनी सध्या घरे शाकारणीची कंत्राटे घेण्यास सुरवात केली आहे. जो जादा पैसे देतो, त्याच्याकडे आधी जायचे, असा या बिगरगोमंतकीय मजुरांचा धंदाच बनला आहे.

हे मजूर जेवढी मजुरी मागतात, तेवढी दिली तरी घरमालकाच्या मनाप्रमाणे घर शाकारून मिळते का, हा सवाल उपस्थित होत आहे. कारण पूर्वीचे गोमंतकीय कामगार हे घर शाकारणीचे काम व्यवस्थित करायचे; पण आता गोमंतकीय कामगार मिळणे कठीण बनत चालल्याने बिगर गोमंतकीय अव्वाच्या सव्वा दर मागतात आणि गोमंतकीय घरमालकांना हे पैसे द्यावे लागत आहेत.

पूर्वी आम्ही घरावर चढून स्वतः शाकारणी करायचो; पण आता आमची मुले हे काम करीत नाहीत. मुले शिकली, मोठी झाली, चांगल्या पगाराच्या नोकरीला लागली, त्यामुळे त्यांना आता कौलारू घरात राहणे कमीपणाचे वाटते. त्यामुळे आता कौलारू घरांचे रूपांतर स्लॅबच्या घरात होताना दिसत आहे.

- प्रमोद नाईक, शिरोडा

कौलारू घरे शाकारण्याचे काम पूर्वी गावातील लोक मिळून करायचे; पण आता ते गावकरी गेले आणि आताची पिढी अशा प्रकारांकडे ढुंकूनही पाहत नाही, त्यामुळे पुढील काळात कौलारू घरे दिसणे मुश्‍कील होईल.

- राजेंद्र गावकर, तिस्क - उसगाव

केवळ चारच तास काम...

घरे शाकारण्याचे काम हे एप्रिल ते मे महिन्यात सुरू होते. पूर्वीच्या काळी सकाळी ७ वाजता घरे शाकारण्यासाठी कामगार घरावर चढत आणि ११ वाजायच्या आत खाली उतरत. ऐन एप्रिल आणि मे महिन्यात वाढत्या उन्हाच्या झळा, त्यातच कौले तापत असल्याने दुपारी घर शाकारणे मुश्‍कील बनते; पण केवळ चारच तास काम असूनही हे काम करायला आता गोमंतकीय कामगारच मिळत नसल्याने घरमालकांचे वांदे होत आहेत.

कंटाळून लोकांनी पत्रे चढवले

कौलारू घरे शाकारण्यासाठी कामगार मिळत नाहीत, त्यातच कौले विकण्याचे दुकानदारांनी कमी केल्याने कौलांचे वाढते दर, मजुरी वाढलेली, त्यामुळे आता घरमालकांनी सरळ घरावरील कौले उतरवून पत्रे घालण्यास सुरवात केली आहे.

हे पत्रे घरावर आच्छादले की आणखी दहा पंधरा वर्षे त्याकडे पाहायची गरजच नाही, अशी स्थिती असल्याने कौलारू घरांचे अस्तित्वच नष्ट होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT