Bandoda Gomantak Digital Team
गोवा

Ponda News : मडकईला चांगले ते देण्याचा सुदिन यांचा प्रयत्न !

मान्यवरांचे मत : बांदोड्यात भूमिगत वीजवाहिनी कामास प्रारंभ, वीज समस्या मिटवण्याचा निर्धार

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : मडकई मतदारसंघासाठी जे चांगले ते देण्याचा या मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सातत्याने प्रयत्न केले असून आता भूमिगत वीजवाहिन्या घालून पूर्ण मतदारसंघातील वीज समस्या दूर करण्यात येत असल्याने ही बाब मडकई मतदारसंघातील नागरिकांसाठी आनंदाची असल्याचे मत विविध मान्यवरांनी बांदोडा येथे आज (गुरुवारी) झालेल्या वीज खात्याच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते तसेच इतर पंचसदस्य, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस तसेच वीज खात्याचे इतर अधिकारी पी. पी. भरतन, केशव गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यामुळे वीज खात्यात आमुलाग्र बदल झाले असून राज्यातील सर्वांत आदर्श असे हे खाते करण्यासाठी ढवळीकर यांचे प्रयत्न असल्याचे वीज खात्याच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक यांनी आपले विचार व्यक्त करताना वीजमंत्री ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मडकई मतदारसंघाचा सातत्याने विकास होत असून नागरिकांना जे चांगले ते देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे नमूद केले. वीज खात्याकडून भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामामुळे काहीवेळेस लोकांना वाहतूक तसेच धूळ व इतर समस्या जाणवू शकतात, पण त्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असून नागरिकांनीही या चांगल्या कामाला सहकार्य करावे, असे आवाहन गणपत नाईक यांनी केले.

मंत्र्यांचे वीज कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन !

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळेच वीज खात्यातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. जे चांगले ते देण्याचा प्रयत्न सुदिन ढवळीकर यांच्याकडून होत असून सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चून मडकई मतदारसंघातील विविध विजेच्या समस्या दूर करणे तसेच भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

वीज खात्याने राज्यात विविध ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकणे तसेच ट्रान्स्फॉर्मर उभारणे आणि इतर साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी एका वर्षांत खूप मोठी कामे केली असून सुमारे नऊशे कोटी रुपयांची कामे आता हातावेगळी होत असल्याचे वीज खात्याच्या मुख्य अभियंत्याने नमूद केले. यापूर्वी अशाप्रकारचे काम झाले नव्हते, असेही या खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मडकई मतदारसंघाचा कायापालट

सरपंच सुखानंद कुर्पासकर म्हणाले,की बांदोडा पंचायतीतील विविध विकासकामे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सर्व नागरिकांचा त्यांना पाठिंबा असल्यामुळेच ही कामे होऊ शकली. मडकई मतदारसंघाचा कायापालट होत असून पुढील काळात एक उत्कृष्ट मतदारसंघ म्हणून मडकईला प्राधान्य मिळेल..

ढवळीकरांची अनुपस्थिती जाणवली

मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. आजारी असल्याने सुदिन ढवळीकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, तरीही त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातील वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा आणि भूमिगत वीजवाहिन्या टाकून पावसाळ्यात तसेच वादळवाऱ्यात उघड्यावरील वीजवाहिन्या तुटून होणारे नुकसान दूर होणार असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT