Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Third District: फोंडा असणार तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय? रवींची स्वप्नपूर्ती दृष्टीपथात... निर्मितीसाठीची कार्यवाही सुरु

Minister Ravi Naik: राज्यातील तिसरा जिल्हा निर्मितीला प्रारंभ झाला असून फोंडा या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय असेल.

Manish Jadhav

राज्यातील तिसरा जिल्हा निर्मितीला प्रारंभ झाला असून फोंडा या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय असेल आणि त्यासाठीच्या प्राथमिक स्तरावरील कामाला प्रारंभ झाल्याने फोंडा तसेच लगतच्या इतर भागातील नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एका अर्थाने फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची ही स्वप्नपूर्ती ठरणार आहे.

उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्ह्यांनंतर तिसऱ्या जिल्ह्याचा मान आता फोंड्याला मिळणार असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चाचपणी सुरु असली तरी लोकांना हवा असलेला तिसरा जिल्हा निर्मितीसाठी सरकारने (Government) वेगवान हालचाली कराव्यात अशी जोरदार मागणी फोंड्यासह इतर भागातील नागरिकांनी केली आहे. यापूर्वीच्या विधानसभेत ही मागणी मागे ठेवण्यात आली होती, पण आताच्या विधानसभेने तिसरा जिल्हा निर्मितीची मागणी उचलून धरल्याने सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

फोंडा (Ponda) हे खरे म्हणजे गोवा राज्याची सांस्कृतिक राजधानी मानले जाते, राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या फोंड्याच्या सभोवतालचा प्रदेश घेऊन फोंडा शहरात तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठीचे प्राथमिक काम सध्या सुरु आहे. फोंड्यासह इतर भागातील लोकांची जिल्ह्याच्या ठिकाणी पणजी किंवा मडगावला जाण्यासाठी लागणारे हेलपाटे आणि त्यातच पैसा आणि वेळ वाया जाण्याच्या प्रकारामुळे फोंडावासीय वैतागले होते.

रवी नाईक यांच्याकडून पाठपुरावा

फोंड्याला तिसरा जिल्हा करण्यासाठी या भागाचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारावेळी आपल्या जाहीरनाम्यात फोंडा हा तिसरा जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करू हे प्रमुख आश्‍वासन रवी नाईक यांनी दिले होते आणि ते आता पूर्णत्वास येण्यासाठी प्राथमिक कार्यवाही होत असल्याने रवींसाठी ही एक स्वप्नपूर्तीच असल्याचे मानले जात आहे.

तिसऱ्या जिल्ह्यात फोंडा तालुक्यासह धारबांदोडा, सत्तरी व साखळीचा प्रामुख्याने अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या जिल्ह्यात कोणते प्रदेश घालावेत, कुणासाठी तिसरा जिल्हा फायदेशीर ठरू शकतो, कोणती गावे फोंड्यापासून जवळ आहेत, किती गावे दूर आहेत, त्या सर्वांचा लेखाजोखा आता मांडण्यात येणार आहे. तिसरा जिल्हा हा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

रवी नाईक, कृषिमंत्री व फोंड्याचे आमदार

फोंडा मतदारसंघाचा आमदार या नात्याने मी या मतदारसंघाला चांगले ते दिले. मुख्यमंत्री व नंतरच्या काळात मंत्रिपदी असल्याने फोंड्याबरोबरच संपूर्ण गोवा राज्याचा विचार केला. सर्वसामान्य जनतेला नेमके काय हवे आहे, त्याचा विचार करूनच मी तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी केली आणि आता या मागणीचा विचार मुख्यमंत्र्यांनी करून प्राथमिक स्तरावरील कामाला सुरवात होत आहे. त्यामुळे लगेचच तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती होईल, हे निश्‍चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT