Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात काही धक्कादायक निकालांचे संकेत, मातब्बर नेत्यांचे भवितव्य पणाला; 7 ही मतदारसंघात उत्सुकता शिगेला

Ponda ZP Election: फोंड्यातील सात मतदार संघापैकी उजगाव-गांजे हा मतदारसंघ वाळपई विधानसभा मतदान संघात येत असल्यामुळे त्यावर आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंचे अधिराज्य दिसत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: मतदानानंतर आता फोंडा तालुक्यातील सात मतदारसंघातून कोण जिंकणार, याची चर्चा जोरात आहे. या निकालावर वीज मंत्री सुदीन ढवळीकर, जलसंवर्धन मंत्री सुभाष शिरोडकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, ‘मगो’ चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याबरोबरच मगो पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले फोंड्याचे नेते डॉ. केतन भाटीकर, फोंड्याच्या उमेदवारीवर नजर ठेवून असलेले भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी, दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

फोंड्यातील सात मतदार संघापैकी उजगाव-गांजे हा मतदारसंघ वाळपई विधानसभा मतदान संघात येत असल्यामुळे त्यावर आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंचे अधिराज्य दिसत आहे. मतदानानंतर मतदारांच्या मनाचा कानोसा घेतल्यास सातपैकी उजगाव-गांजे, प्रियोळ व शिरोडा या तीन मतदारसंघात एकतर्फी लढतीचे चित्र दिसून येते.

त्यामुळे उजगाव-गांजे व शिरोडा येथे भाजप तर प्रियोळ येथे ‘मगो’ चे पारडे जड असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या तीन मतदार संघाचे विजय आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जलसंवर्धन मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याबरोबर प्रियोळ मतदार संघात कुंडई व मडकई या दोन मडकई मतदार संघातील पंचायती येत असल्यामुळे मंत्री सुदीन ढवळीकर यांचेही स्थान बळकट होऊ शकेल.

‘कवळे’ वर ढवळीकरांचे खास लक्ष

मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणजे कवळे. या मतदारसंघात मडकई मतदार संघातील चार पंचायती येत असल्यामुळे सुदिनांचे या मतदार संघावर बारीक लक्ष आहे. गेल्यावेळी सदस्य असलेल्या ‘मगो’ च्या गणपत नाईक यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांची थेट लढत ‘आरजी’ शी असल्यामुळे याठिकाणी मगो किंवा सुदिन विरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता कमी आहे. गणपत यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी ते किती आघाडी घेतात यावर सुदिनांचे या मतदार संघावर असलेले वर्चस्व अधोरेखित होणार आहे.

भाजप-मगो युती जमली नाही

भाजप- मगो युती आहे असे सांगितले जात असले तरी बऱ्याच मतदारसंघात ती दिसलीच नाही. दोन्ही पक्ष स्वबळावर लढताना दिसत होते. आता हा आगामी विधानसभा निवडणुकीचा ‘ट्रेलर’ आहे की काय, हे मात्र कळू शकले नाही.

कुर्टी, बेतकी, बोरीत ‘काटे की टक्कर’

फोंडा तालुक्यातील सर्वाधिक मतदान हे उसगाव मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान हे कवळे मतदारसंघात झाले. मगो पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते बिनधास्त आहेत तर भाजपच्या मनात धाकधूक कायम आहे. कुर्टी, बेतकी, बोरी या तीन मतदारसंघात काटे की टक्कर आहे. कुर्टीत एकूण १४२२१ मतदान झाले आहे. वेलिंग मतदारसंघात १३३२४, बेतकी १५०१३, उसगावात १०४५३, बोरीत १०१९९, शिरोड्यात ११२०८ तर कवळेत १३७०३ एवढे मतदान झाले आहे. त्यात आपल्याला किती मतदान झाले याची आकडेवारी काढण्यात निवडणुकीत उतरलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून आकडेमोड सुरू आहे.

बोरीत भाजप विरुद्ध भाजप

सुभाष शिरोडकर यांची कन्या डॉ. गौरी शिरोडकर शिरोड्यातून रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारसंघाकडे खास लक्ष असेल. बोरीत मात्र भाजपच्या पुनम सामंत व अपक्ष भावना नाईक यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचे संकेत मिळत आहे. नाईक या बोरी पंचायतीच्या विद्यमान पंचसदस्य असून त्यांनी यापूर्वी उपसरपंचपदही भूषविले आहे. त्याही भाजपच्या क्रियाशील कार्यकर्त्या असल्याने भाजप विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळत आहे.

विरोधी पक्ष निष्प्रभ

फोंडा तालुक्याचा विचार केल्यास विरोधी पक्षांना एकही जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही. उजगाव - गांजे, कुर्टी व बोरी या तीन मतदार संघात काँग्रेसने उमेदवार उतरवले असले तरी एकाही मतदार संघात त्यांचे वर्चस्व दिसले नाही. काँग्रेसचे युतीचे भागीदार गोवा फॉरवर्ड यांनी शिरोडा मतदार संघात उमेदवार उभा केला असला तरी त्या उमेदवाराचा बिलकुल प्रभाव दिसला नाही.

‘कुर्टी’ त फड रंगला

फोडा पोटनिवडणूक जवळ असल्यामुळे या मतदार संघाचा एक प्रमुख भाग ‘कुर्टी’त फड रंगल्याचे दिसून आले.

दोन दिशांना तोंडे असणारे फोंड्याचे भाजप नेते यावेळी ‘रात्र वैऱ्याची, जागा राहा’ या तत्त्वाप्रमाणे काम करताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

Christmas 2025: रंगीबेरंगी दिवे, मोठे ख्रिसमस ट्री! राज्यात नाताळ सणाची तयारी जोरात; रस्ते, बाजारपेठा सजावटीने उजळल्या

अग्रलेख: पक्ष-अपक्ष जिंकतील, लोक हरतील!

Manohar Parrikar: 'मनोहर पर्रीकर हे निर्भीड, धुरंधर, द्रष्टे राजकीय नेते'! बायणा रवींद्र भवनमध्ये जयंती साजरी; भाईंच्या आठवणींना उजाळा

मोठी बातमी! गोव्यातील राष्‍ट्रीय महामार्गांसंदर्भातील 151 कोटींचे 5 प्रकल्‍प प्रलंबित; लोकसभेत गडकरींनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT