Power Minister Sudin Dhavalikar while inaugurating the electricity works Dainik Gomantak
गोवा

Ponda Power Lines : वीज वितरणातून ग्राहकांना चांगले ते देणार!

सुदिन ढवळीकर : कवळेत भूमिगत वीजवाहिन्या कामाचा शुभारंभ, वीज उपकेंद्राचे काम ऑगस्टमध्ये

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : राज्यातील वीज वितरणात आमूलाग्र बदल करताना ग्राहकांना चांगले ते देण्याचा माझा प्रयत्न असून याकामी नागरिकांचेही सहकार्य तेवढेच महत्त्वाचे आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. कवळे येथील वीज उपकेंद्राच्या कामाला येत्या ऑगस्टपासून सुरवात होईल, अशी ग्वाहीही ढवळीकर यांनी दोनखांब - कवळे येथे आज (गुरुवारी) वीज खात्याच्या भूमिगत वीजवाहिनी घालण्याच्या कामाच्या शुभारंभावेळी दिली.

खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, कवळे सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर, वाडी तळावलीच्या सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर तसेच इतर पंचसदस्य आणि वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता भरतन व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

ढवळीकर म्हणाले, मडकई मतदारसंघासह फोंडा तालुका आणि राज्यभरातील वीज वितरणात सुसूत्रता आणण्यात येत आहे. त्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामासह वीज ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढवणे आणि वीज वितरणासाठी अद्ययावत उपकरणे पुरवणे आदी कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. आत्तापर्यंत नऊशे कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून पुढील काळात नक्कीच विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार प्रयत्न करील.

खासदार तेंडुलकर म्हणाले, सुदिन ढवळीकर यांना कोणतेही खाते द्या, या खात्याला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. फोंडा तालुक्यासह राज्यातील वीज वितरणात चांगली सुधारणा होत असून पुढील काळात वीज खाते निश्‍चितच चांगली कामगिरी करील.

जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक यांनी ढवळीकर यांनी मडकई मतदारसंघाबरोबरच इतर मतदारसंघातही विकासाची कामे केली असून चांगल्या कामाचा त्यांनी नेहमीच अट्टहास धरला, म्हणूनच लोक त्यांच्यासोबत आहेत. स्टिफन फर्नांडिस यांनी वीज खात्याच्या चांगल्या कामात नागरिकांचाही तेवढाच महत्त्वाचा सहभाग असल्याचे नमूद करताना मंत्री ढवळीकर यांचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्यानेच कामे त्वरित होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सरपंच मनुजा नाईक यांनी केले तर वाडी तळावली सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'अशी मीटिंग झालीच नाही'! तवडकरांच्या विषयावरून प्रदेशाध्‍यक्षांचे कानावर हात; भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया

Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

SCROLL FOR NEXT