Goa Police|Ponda Police Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: ..'संशय' आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा! वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांवरून नागरिकांना 'सतर्क' राहण्याचे आवाहन

Ponda Crime News: राज्यातील वाढत्या चोऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांना ठकवण्याचे प्रकार घडत असल्याने फोंडा पोलिसांनी या प्रकाराविरुद्ध लोकांत जागृती करण्याच्या उपक्रमाला वेग दिला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Police Awareness Campaign Against Crime

फोंडा: राज्यातील वाढत्या चोऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांना ठकवण्याचे प्रकार घडत असल्याने फोंडा पोलिसांनी या प्रकाराविरुद्ध लोकांत जागृती करण्याच्या उपक्रमाला वेग दिला आहे. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्याबरोबरच सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

फोंड्यात आज सराफी दुकानांतील सुरक्षिततता लक्षात घेऊन सर्व व्यापाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सराफी दुकाने चोरट्यांकडून टार्गेट करण्याचे प्रकार घडत असल्याने त्यादृष्टीने सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबरोबरच इतर खबरदारीही घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी केले.

राज्यातील चोरटे रस्त्यावर एखाद्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पाहून त्यांना काहीतरी विचारण्याच्या उद्देशाने अशा ज्येष्ठ नागरिकांच्या खास करून महिला वर्गाच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशा लोकांबद्दल काही शंका असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन फोंडा (Ponda) पोलिसांनी केले आहे. सायबर गुन्हेही होत असल्याने मोबाईल बँकिंग तसेच इतर घटनांमुळे पैसे चोरले जात असल्याने बँक ग्राहकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

वाहतूक सुरक्षेसंबंधी जनजागृती

फोंड्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनीही वाहतूक सुरक्षेसंबंधी बैठक घेऊन जनजागृती केली. राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी, असे कृष्णा सिनारी यांनी सांगितले. वाहनचालक तसेच इतरांची यावेळी उपस्थिती होती. फोंड्यातील रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवण्यात येणारे ट्रक हटवले जात असून आवश्‍यक दंडही केला जात आहे, अशीही माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. फोंडा भागात वाहतूक सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलिस कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

पोलिस समर्थ आहेच, पण सहकार्य करा!

एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस समर्थ आहेतच, पण नागरिकांनीही पोलिसांना आवश्‍यक सहकार्य करण्याची गरज पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी व्यक्त केली. सायबर गुन्हे वाढल्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात असल्याने विशेषतः युवा वर्गाने आपल्या घरातील तसेच शेजारील ज्येष्ठांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांचा संशय आल्यास त्वरित पोलिसांकडे संपर्क साधा, असेही आवाहन विजयनाथ कवळेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT