Ponda Electricity Shortage Dainik Gomantak
गोवा

Ponda Electricity Shortage : फोंडा तालुक्‍याचा ग्रामीण भाग चाचपडतोय अंधारात!

विजेचा दररोज लपंडाव : दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम; शहरातही रात्रीच्‍या वेळी पसरतो सन्नाटा

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Ponda Electricity Shortage : एकीकडे पाऊस मी म्हणत असताना दुसरीकडे विजेच्या लपंडावाने फोंड्यातील नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. वीज कधी नसते, यापेक्षा ती कधी असते हे शोधण्याएवढी सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. ग्रामीण भागात तर लोकांना अंधारात वास करावा लागतोय. कवळे, बांदिवडे भागात चार-चार दिवस वीज गायबच असते.

झाडे पडत असल्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येतोय असे वीज खात्याकडून सांगितले जात असले तरी ही झाडे पावसाळ्यापूर्वी का कापली नाहीत? हा प्रश्‍न उपस्थित करण्‍यात येत आहे.

फोंडा आणि परिसरात रात्री-बेरात्री वीज जात असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. एकीकडे पावसाचे तुफान तर दुसरीकडे अंधार अशी स्थिती असल्यामुळे शहरही एखाद्या जंगलासारखे दिसायला लागते.

फोंडा शहरात वीज कधी जाईल हे सांगणे कठीण बनले आहे. वीज नसल्‍याने अनेक आस्‍थापनांच्‍या व्यवसायावर परिणाम होऊ लागलाय. त्यात परत रस्त्यावरची वीजबत्ती नसल्यामुळे भुरट्या चोरट्यांचे आयतेच फावलेय.

एकट्यादुकट्या जाणाऱ्या बायकांना हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र वा हार ओढून पोबारा करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झालेला दिसत आहे. त्याचबरोबर छोटे-मोठे अपघातही घडायला लागले आहेत.

याबाबत तक्रार करायला गेल्यास वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून तक्रारी दखलच घेतली जात नाही. ‘आम्हाला अनेक कामे आहेत. त्यामुळे तुमच्याकडे यायला वेळ लागेल’ असे सांगून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे लोकांना कोणीच वाली उरलेला दिसत नाहीय.

त्याचबरोबर वीजपुरवठ्यातील अनियंत्रित दाबामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे बंद पडू लागली आहेत. सकाळी सकाळीच वीज जात असल्यामुळे गृहिणींना अनेक समस्यांशी तोंड द्यावे लागतेय.

‘तो’ आवाज आला की काळजात होते धस्स!

फोंडा बाजारात मध्यवस्तीत असलेल्‍या वीज ट्रान्सफॉर्मरचा मोठा आवाज येत आहे. हा आवाज सुरू झाला की वीज गायब होते. या आवाजाने सध्या बाजारात भयग्रस्त वातावरण पसरले असून तेथील रहिवासी तसेच दुकानदारांसाठी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे.

याबाबत अनेक तक्रारी देऊनही वीज खात्याने त्‍यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. हा आवाज नेमका का येतो याचे आकलन होणे कठीण झाले आहे.

पण रात्री-बेरात्री आवाज आला की लोकांची झोपमोड होते, शिवाय घबराट पसरते. कारण तेव्‍हा वीज जाते व काळोख पसरलेला असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT