Ponda opening of the hall building built cost crores useless Gomantak Digital Team
गोवा

Ponda news : सभागृह उद्‌घाटनाला मुहूर्त मिळेना, कोट्यवधींचा खर्च करून बांधलेली इमारत विनावापर

बेतोडातील दप्तर दिरंगाई : कोट्यवधींचा खर्च करून बांधलेली इमारत विनावापर

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : बेतोडा, निरंकाल, कोनशे-कोडार ग्रामपंचायतीसाठी नव्याने बांधलेले प्रशस्त सभागृह उदघाटनाच्या प्रतीक्षेत असून सरकार दरबारी तारीख निश्‍चित होत नाही. दीनदयाळ पंचायतराज साधनसुविधा विकास योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 17 लाख रुपये खर्चून सर्व सुविधांनीयुक्त असे हे सभागृह बांधले असून त्याचे उदघाटन होऊन ते वापरात कधी येणार, अशी विचारणा स्थानिकांनी केली आहे.

बेतोडा येथील जुन्या पंचायतीच्या पाठीमागे हे सभागृह आहे. सहा वर्षांपासून सभागृहाचे काम सुरू होते. मध्येच रेंगाळलेले हे काम पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांना सातत्याने आवाज उठवावा लागला. अखेर सहा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सभागृहाचे काम पूर्ण झाले. मात्र, आता त्याच्या उदघाटनाला मुहूर्त सापडत नाही.

साधनसुविधा विकास महामंडळातर्फे सभागृहाचे बांधकाम केले आहे. बेतोडा पंचायत क्षेत्रात सर्व सुविधांनी युक्त वातानुकुलीत व प्रशस्त असे सभागृह नव्हते. त्यामुळे स्थानिकांना लग्न सोहळे व इतर समारंभांसाठी फोंडा शहर किंवा गावातील मंदिरांच्या सभामंडपावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पंचायत क्षेत्रात प्रशस्त असे सभागृह उभारण्याची अनेक वर्षांची मागणी होती.

यासंदर्भात या भागाचे मंत्री सुभाष शिरोडकर यांना विचारले असता, या सभागृहाचे लोकार्पण जुलैमध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सरपंच उमेश गावडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पंचायतीचा महसूल बुडित

या सभागृहाचे उदघाटन झाल्यास स्थानिकांचे कौटुंबिक समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम आणि बिगर सरकारी संस्थांना कार्यक्रमांसाठी ते वापरता येईल. सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर ७०० लोकांची आसन व्यवस्था तर तळमजल्यावर वाहनतळ उपलब्ध केला आहे. पंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करून देणाऱ्या या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी प्रशासन का उदासीनता दाखवते, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

तब्बल सहा वर्षे रखडले काम : सभागृहासाठी निधीही उपलब्ध करून दिला. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींमुळे बांधकामाला 2017 मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर कोरोनामुळे पुन्हा हे काम रखडले. त्यानंतर इतर पंचायत मंडळाने काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. विद्यमान सरपंच उमेश गावडे यांनीही जोर लावल्याने 2022 मध्ये कामाला गती मिळाली आणि अखेर सभागृह पूर्ण झाले.

2013 साली मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते, तेव्हा सरपंच पूनम सामंत यांनी हे सभागृह मंजूर करून घेतले. त्यावेळी जीएसआयडीसीचे अध्यक्ष विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत होते. या सभागृहासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, तेवढ्या रकमेत प्रशस्त सभागृह होणार नसल्याने पर्रीकर यांना विनंती केल्यावर त्यांनी निधी वाढवला. त्यामुळे हे आलिशान सभागृह उभारता आले.

- चंद्रकांत सामंत, पंच सदस्य, बेतोडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT