Ponda fish market dispute Dainik Gomantak
गोवा

Ponda Fish Market: आधी जागा निश्चित करा, मग आम्हाला हटवा! फोंडा मासळी मार्केटमधील विक्रेत्यांची मागणी; नगराध्यक्ष करणार मध्यस्थी

Ponda fish market dispute: फोंडा वरचा बाजार भागातील सुमारे चाळीस वर्षे जुन्या मासळी इमारतीची स्थिती सध्या धोकादायक बनली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: फोंड्यातील जुनी मासळी इमारत पाडून त्याजागी नवीन पालिका बाजार उभारण्याच्या कामासाठी आज गुरुवारी या इमारतीतील मासळी विक्रेत्यांना स्थलांतर करण्याचा प्रयत्न फोंडा पालिकेने केल्यावर मासळी विक्रेत्यांनी आधी योग्य जागा निश्‍चित करा, पाण्याची व्यवस्था करा असे सांगत आक्षेप घेतला.

शेवटी प्रकरण फोंडा नगराध्यक्षांकडे पोचल्यावर नगराध्यक्षांनी विक्रेत्यांना कुणावरही अन्याय होणार नाही असे सांगताना उद्या शुक्रवारी ४ रोजी या विषयावर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

फोंडा वरचा बाजार भागातील सुमारे चाळीस वर्षे जुन्या मासळी इमारतीची स्थिती सध्या धोकादायक बनली असून या ठिकाणी फोंडा पालिकेने स्थानिक आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पालिका बाजार उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून आज गुरुवारी या मासळी विक्रेत्यांना बाजूलाच असलेल्या मार्केट प्रकल्पातील तळमजल्यावर जागा उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, जागेचे वाटप पुरेसे नाही त्यातच पाण्याची सोय नाही, असे कारण देऊन मासळी विक्रेत्यांनी त्याला आक्षेप घेतला. स्थलांतर करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, योग्य सुविधा हवी, असे मासळी विक्रेत्यांनी नगराध्यक्षांना सांगितले.

शंभरपेक्षा जास्त मासळी विक्रेते

फोंडा बाजारात शंभरपेक्षा जास्त मासळी विक्रेते आहेत. या सर्वांची नोंद फोंडा पालिकेत असून त्यानुसार जागा वाटप करण्यात येत आहे. कुणावरही अन्याय होणार नाही. मात्र, फोंडा पालिकेत गोमंतकीयांच्या नावावर बिगर गोमंतकीय व्यवसाय करतात त्याचे काय? असा सवालही उपस्थित होत आहे. यासंबंधी फोंडा पालिका योग्य निर्णय घेईल, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT