Ponda Old Bus Stand Troubled Stinking Water Vendors Vegetable sellers suffered huge losses Gomantak Digital Team
गोवा

Ponda News : फोंडा जुन्या बसस्थानकावर तुंबले दुर्गंधीयुक्त पाणी; विक्रेत्‍यांना त्रास

भाजीविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : फोंड्यातील जुन्या बसस्थानकावरील पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर पाणी साचणे ही पावसाळ्यात नित्याचीच बाब आहे. काल रविवारी तर हा परिसर पाण्‍याने तुडुंब भरला होता. त्‍यामुळे भाजीविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. शौचालयातील सांडपाणी गटारात सोडले जात असल्याने दुर्गंधी असह्य होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. दरम्‍यान, आज सोमवारी पाऊस नसतानाही पाण्‍याचा निचरा न झाल्‍याने लोकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

जुन्या बसस्थानकावर साचलेले हे पाणी पावसाचे नसून सांडपाणी असल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे. शहरात अशी घटना प्रथमच घडली असून काही लोकांनी गुदमरलेल्या गटारांमध्ये सांडपाणी सोडले असावे व त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असावी, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. दुर्गंधीमुळे ग्राहक फिकरलेच नाहीत. कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली, अशी तक्रार एका भाजीविक्रेत्याने केली.

दादा वैद्य चौकातील विक्रेत्‍यांचे नुकसान

दादा वैद्य चौकातील विश्‍‍वलक्ष्मी इमारतीसमोरील गटारांची साफसफाई न केल्याने फोंडा मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दररोज संध्याकाळी सहानंतर तुंबलेल्‍या गटारांतून असह्य दुर्गंधी येऊ लागते. त्‍यामुळे उंदीर तसेच अन्य प्राणी जवळील दुकाने आणि हॉटेलमध्ये प्रवेश करून नुकसान करतात. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी गटारे साफ करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले होते, परंतु ते निष्फळ ठरल्याचे या परिसरातील एका निवासी इमारतीतील दुकानमालकांनी सांगितले.

सांडपाण्याच्या असह्य दुर्गंधीमुळे लोकांनी फोंडा जुना बसस्‍थानक परिसरात जाणे टाळले. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. फोंडा पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भविष्‍यातील परिस्‍थितीची कल्‍पनाही करू शकत नाही. सरकारकडे तक्रार करणार असून प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देणार आहे. - विराज सप्रे, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT