Agriculture Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Agriculture Minister Ravi Naik: एमआरएफकडून सामाजिक जाणिवेतून कार्य

Agriculture Minister Ravi Naik: मंत्री रवी नाईक फोंडा पालिकेला शववाहिका, शवपेट्या प्रदान कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Agriculture Minister Ravi Naik: राज्यात कार्यरत विविध कंपन्यांनी समाजहितेषी निधीतून सामाजिक उपक्रम साकारावेत आणि त्याचा लाभ नागरिकांसाठी करून द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंडा पालिकेतर्फे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे एमआरएफ कंपनीतर्फे शववाहिका तसेच शवपेटी प्रदान कार्यक्रम आज (मंगळवारी) झाला, त्यावेळी रवी नाईक बोलत होते.

एमआरएफ कंपनीचे सरव्यवस्थापक गौतम राज, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, रूपक देसाई, शिवानंद सावंत, शौनक बोरकर, गिताली तळावलीकर, वेदिका वळवईकर व इतर नगरसेवकांसह मुख्याधिकारी शुभम नाईक इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

रवी नाईक म्हणाले, एमआरएफ कंपनीने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेऊन आपली जबाबदारी व्यवस्थित निभावली आहे.

समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून कंपन्यांनी किंवा आस्थापनांनी काम केले तर ते समाजासाठी उपयुक्त ठरते, आणि सरकार व समाज यांच्यामधील या कंपन्या एक दुवा बनू शकतात, एमआरएफचे गौतम राज यांनी फोंडा पालिकेला महत्त्वाची ठरलेली शववाहिका आणि वातानुकूलित शवपेटी प्रदान केल्याने फोंडा तालुक्यातील नागरिकांसाठी त्याचा लाभ होईल, असे सांगून फोंडा पालिकेकडून खूप चांगले काम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गौतम राज म्हणाले, एमआरएफ कंपनीने आपली जबाबदार ओळखून अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारले आहेत. मागच्या पाच वर्षांत शंभरपेक्षा जास्त समाजहितेषी उपक्रम आखून त्याचा लाभ नागरिकांना करून दिला.

रितेश नाईक म्हणाले, समाजासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून निधी राखीव ठेवला जातो, त्याचा लाभ करून देण्याची आवश्‍यकता असून एमआरएफने एक खूप चांगला उपक्रम आखला आणि त्याचा लाभ फोंडावासीयांना करून दिल्याचे रितेश नाईक म्हणाले. पालिका मुख्याधिकारी शुभम नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

गौतम राज यांना रवी नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या उपक्रमासाठी सहकार्य केलेले नगरसेवक रूपक देसाई यांचाही कृषीमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

रितेश नाईक यांचे अभिनंदन!

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी विविध कंपन्यांकडून सीएसआर उपक्रमाखाली अनेक कामी हाती घेतली यापूर्वी तिस्क - फोंड्यातील उद्यानाचे नूतनीकरण तसेच इतर कामाचा समावेश असून यावेळेला एमआरएफकडून शववाहिका तसेच वातानुकूलित शवपेटी एमआरएफकडून उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. एमआरएफछे गौतम राज यांनीही रितेश नाईक यांचे कौतुक करताना अशा प्रकारचे काम लोकप्रतिनिधींकडून व्हायला हवे, असे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT