Ponda Municipal Council Election Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality: थकीत भाडे भरण्यास सहा महिन्यांची मुदत! पालिका बैठकीत निर्णय; गाळे भाडेपट्टीवर दिलेल्यांना सूट नाही

Market Complex Shop: या व्यावसायिकांनी सहा महिन्यात थकबाकी भरण्याचे लेखी आश्‍वासन पालिकेला दिल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: येथील पालिका मार्केट संकुलातील गेल्या दहा वर्षांपासून गाळ्यांचे भाडे न भरलेल्या व्यावसायिकांना थकबाकी भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या पालिकेच्या खास बैठकीत झाला.

या व्यावसायिकांनी सहा महिन्यात थकबाकी भरण्याचे लेखी आश्‍वासन पालिकेला दिल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला. मात्र ज्यांनी आपले गाळे इतरांना भाडेपट्टीवर दिले आहेत, त्यांना सूट मिळणार नाही. त्यांनी त्वरित थकीत भाडे भरावे अन्यथा टाळे खोलण्यात येणार नाही, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष नाईक यांच्यासह इतर नगरसेवक , मुख्याधिकारी योगिराज गोसावी तसेच पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. या मार्केट संकुलातील थकीत भाड्याची रक्कम दोन कोटीवर गेल्यानंतर त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी या गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले. सव्वीसपैकी सोळा गाळ्यांचे थकीत भाडे भरावयाचे असून या गाळ्यांत जे स्वतः व्यवसाय करतात त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ज्यांनी आपले गाळे दुसऱ्याला भाडेपट्टीवर दिले आहेत, त्यांना पुढील तीन दिवसांच्या आत थकीत भाडेपट्टी भरावी लागणार आहे.

गाळेधारकांची धावपळ

थकीत भाडेपट्टीमुळे पालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे. पालिकेने धडक कारवाई करत थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांना नोटीस बजावली होती. दरम्यान, काही गाळेधारकांनी थकीत भाडे भरले आहे. ज्यांनी नोटिशीकडे दुर्लक्ष केले, त्या गाळ्यांना पालिकेने टाळे ठोकले होते. या मार्केट संकुलातील काही गाळ्यांचा विषय न्यायालयात (Court) आहे, त्यामुळे निकाल आपल्याच बाजूने लागेल असा दावा या दुकानदारांनी केला होता, पण त्यापूर्वीच पालिकेने त्यांना दणका दिला आहे. त्यामुळे या गाळेधारकांची सध्या धावपळ सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

Goa RoadRepair: '..येत्‍या 15 दिवसांत रस्‍ते सुधारू'! CM सावंतांचे आश्‍‍वासन; खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ‘आप’ आक्रमक

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

SCROLL FOR NEXT