Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Election: निवडणूकीचा धुरळा उडणार; फोंडा नगरपालिका निवडणूक एप्रिल अखेर

Ponda Municipality: निवडणुका जवळ येत असल्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून प्रचाराचा नवीन नवीन फंडा शोधताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

Ponda Municipality: फोंडा नगरपालिका निवडणुका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत. विद्यमान नगरपालिका मंडळाची मुदत 22 मे रोजी संपत असल्यामुळे तत्पूर्वी नूतन नगरपालिका मंडळ अस्तित्वात येण्याची आवश्यकता आहे.

निवडणुका जवळ येत असल्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून प्रचाराचा नवीन नवीन फंडा शोधताना दिसत आहेत. सध्या म्हादईचा प्रश्न ऐरणीवर असला तरी त्याचेच भांडवल करून हे इच्छुक उमेदवार प्रचाराचा नवीन मार्ग शोधताना दिसत आहेत.

बहुतेक विद्यमान नगरसेवक परत एकदा रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. आतापर्यंत एकूण सहा नगराध्यक्ष झाले असून विद्यमान नगरध्यक्ष रितेश नाईक यांनाही हटवण्याचा प्रयत्न झाला होता,

पण विरोधकांच्या बाजूने असलेले शांताराम कोलवेकर यांनी अनपेक्षितपणे परत एकदा भाजपमध्ये उडी घेतल्यामुळे रितेश यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बारगळला होता.

आतापर्यंतच्या विकासाचा आढावा घेतल्यास या नगरपालिका कक्षेत विशेष विकास झालेला दिसून येत नाही. अपवाद फक्त गेल्या दहा महिन्याचा. फोंडा बाजारमध्ये जवळजवळ 70 कोटी खर्च करून बांधलेली शेड व त्याला लागून पूर्ण केलेला रस्ता हे विद्यमान मंडळाचे गेल्या दहा महिन्यांतील प्रमुख कार्य.

अजूनही बरीच विकासकामे कागदावर आहेत. पण आता मंडळाचीच मुदत संपत असल्यामुळे ही कामे पूर्ण होतील की नाही सांगता येणे कठीण आहे. यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य टांगणीवर लागल्यासारखे झाले आहे.

विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, व्यंकटेश नाईक, प्रदीप नाईक यासारखे काही विद्यमान नगरसेवक सोडल्यास इतरांच्या भवितव्याबद्दल सांगणे कठीण आहे.

त्यात परत आरक्षणामुळे किती जणांचे पत्ते कट होतात याचेही आकलन होणे मुश्कील आहे. गेल्या वेळेला प्रभाग महिलांकरिता आरक्षित असल्यामुळे तेंव्हाच्या काही नगरसेवकांनी आपल्या पत्नींना रिंगणात उतरवले होते. आता ते परत आपल्या प्रभागातून निवडणूक लढवू शकतात.

विद्यमान मंडळात मगोपचे पाच नगरसेवक असून आगामी निवडणुकीत ते कोणती भूमिका स्वीकारतात याचा अंदाज अजून आलेला नाही.

काँग्रेसचे चार ते पाच उमेदवार

आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून कमीत कमी चार ते पाच उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, असे फोंड्याचे काँग्रेस गटाध्यक्ष विलियम आगियार यांनी सांगितले. जे उमेदवार फोंड्याचा विकास करू शकतील अशांनाच उमेदवारी दिली जाईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT