Goa Agriculture Scam: बांध फुटून मडकईतील आम्रे खाजन शेतीत खारे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकाराला शेतकरी समिती जबाबदार असून बांधाच्या कामात तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
फोंड्याच्या मामलेदारांनी यात हस्तक्षेप करून दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी आज शेतकऱ्यांनी केली. खाजन शेती कार्यकारिणी समितीने बांधाचे काम करण्यास अनास्था दर्शवल्यामुळेच हा प्रकार झाल्याचा त्यांचा दावा आहे.
मडकई येथे झालेल्या या बैठकीला उपस्थित संघटनेच्या कार्यकारिणीने सविस्तर आर्थिक अहवाल देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावर समितीने सहा वर्षे कामकाज सांभाळले. मात्र, अद्याप हिशेब दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
संघटनेचे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत आर्थिक व्यवहार असून या बँकेतील व्यवहारावर मामलेदारांनी तात्पुरते निर्बंध आणले आहेत. एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरून हे निर्बंध आणले गेले आहेत.
तरीही समितीने बोरी येथील इंडियन ओव्हरसीज बँकेतील खाते पुनरुज्जीवीत करून त्यातील पैशांचा वापर केला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
पावणीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेला दरवर्षी तीस ते पस्तीस लाख रुपये महसूल मिळतो. मात्र, मागील सहा वर्षांच्या पावणीचा हिशेबच दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हा हिशेब आधी द्या, अशी मागणी त्यांनी केली. यावर गरमागरमी झाल्यावर शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.