Ponda Municipal Council Meeting | Anand Naik  Dainik Gomantak
गोवा

Ponda News: फोंडा मास्टरप्लॅनला 'ग्रीन सिग्नल'! ४ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर

Ponda Master Plan: फोंडा पालिकेच्या महत्त्वाकांक्षी मास्टरप्लॅनच्या पहिल्या टप्प्याच्या उद्यान सौंदर्यीकरण तसेच अन्य विकासकामांना मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारकडून या कामासाठी ४ कोटी ५७ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Municipal Council Meeting For Master Plan Presentation

फोंडा: फोंडा पालिकेच्या महत्त्वाकांक्षी मास्टरप्लॅनच्या पहिल्या टप्प्याच्या उद्यान सौंदर्यीकरण तसेच अन्य विकासकामांना मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारकडून या कामासाठी ४ कोटी ५७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामासंबंधीची माहिती फोंडा पालिकेच्या आज बैठकीत सचित्र देण्यात आली.

फोंडा पालिकेच्या या बैठकीला स्थानिक आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक उपस्थित होते. नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ज्यांच्या कारकिर्दीत मास्टरप्लॅनच्या निर्मितीला प्रारंभ झाला ते माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक व इतर नगरसेवकांची आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे नियुक्त केलेल्या कन्सल्टंटतर्फे चित्रफितीद्वारे नियोजित विकासकामाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. मास्टरप्लॅनच्या या पहिल्या टप्प्यातील विकासकामात उद्यानाचे सौंदर्यीकरण, ज्येष्ठ नागरिकांना विरंगूळा स्थान, जॉगिंग ट्रॅक, कलाकारांसाठी खास ऑडिटोरियम, छोटे क्रीडांगण, फुडकोर्ट तसेच इतर सुविधांचा समावेश आहे. खडपाबांध येथील नाल्यावर यावेळी छोटा पदपूलही उभारण्यात येणार असून या कामाची सुरवात येत्या डिसेंबर महिन्यापासून होणार असल्याची माहिती देण्यात आली. स्पष्ट केले.

मास्टर प्‍लॅन महत्त्वाकांक्षी! फोंड्याचा मास्टरप्लॅन हा महत्त्वाकांक्षी असून पहिल्या टप्प्यासाठी आवश्‍यक निधीची मंजुरी मिळाल्याने कामाला सुरवात करणे शक्य झाले असून लवकरच हे काम सुरू करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने हा मास्टरप्लॅन पूर्ण करण्यात येईल.
रवी नाईक, कृषिमंत्री गोवा राज्य.
मास्टर प्लॅनचा सातत्याने पाठपुरावा या प्लॅनची कार्यवाही आता सुरू झाली आहे. या मास्टरप्लॅनसंबंधी फोंडावासीयांना यापूर्वीच अवगत करण्यात आले असून स्थानिक आमदार तथा कृषिमंत्र्यांच्या सहकार्याने या कामाला सुरुवात करण्यात येत आहे.
रितेश नाईक, विद्यमान नगरसेवक.
फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा प्रयत्न फोंडा पालिकेतर्फे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. मास्टरप्लॅन हा बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असून या कामाला चालना मिळाल्याने आनंद होत आहे.
आनंद नाईक, नगराध्यक्ष, फोंडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT