Ponda Crime: संसार सोडून 'त्या' दोघी गोव्यात, कारमधून आलेल्या तरुणांनी केलं अपहरण; तपासात उघड झाला चक्रावून टाकणारा घटनाक्रम

Goa Crime News: मूळ नवऱ्यांना सोडून दुसऱ्यांशी संधान बांधून गोव्यात येऊन राहणाऱ्या दोघा महिलांना पळवून नेण्याचा प्रकार महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने म्हार्दोळ पोलिसांनी हाणून पाडला
Goa Crime Latest
Goa Crime LatestCanva
Published on
Updated on

फोंडा: आपल्या मूळ नवऱ्यांना सोडून दुसऱ्यांशी संधान बांधून गोव्यात येऊन राहणाऱ्या दोघा महिलांना पळवून नेण्याचा प्रकार महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने म्हार्दोळ पोलिसांनी हाणून पाडला.

मूळ हरियाना येथील मंजू महेंद्र यादव व सोनम सोनू लाठार तसेच मंजू यादव हिचा भाऊ महेंद्र यादव यांना गाडीत कोंबून पळवून नेण्याचा प्रकार म्हार्दोळ पोलिसांनी उधळून लावला. या महिलांसह एका पुरुषाचे अपहरण झाल्याची आणि गाडी महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याची तक्रार सोनू लाठार याने म्हार्दोळ पोलिसांत केल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी लगेच महाराष्ट्र (Maharashtra) पोलिसांकडे संपर्क साधून संबंधित गाडी व आतील माणसांची माहिती दिल्यानंतर संगमेश्‍वर पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली.

Goa Crime Latest
Cyber Crime: फसवणुकीसाठी तब्बल '50 बँक खात्यांचा' वापर! गोवा पोलिसांच्या कारवाईत महाराष्ट्रातील दोघांना अटक

म्हार्दोळ पोलिसांनी गाडीसह आतील दहाही जणांना गोव्यात आणले. या गाडीतील अपहरण केलेल्या दोन्‍ही महिला व एका पुरुषाची सुटका करण्यात आली असून म्हार्दोळ पोलिसांनी मनोजकुमार यादव, महिपाल मेहरचंद, बिरसिंग संतोष सिंग, सत्यपाल लखिराम, दीपक बिरसिंग, सुमेर सिंग व बजरंग रामचंद्र अशा सातजणांना ताब्यात घेतले आहे.

हरियाणा येथील दोन महिलांनी आपल्या लग्न झालेल्या मूळ नवऱ्यांना सोडून गोव्यात पळ काढला होता. त्यावेळी त्यांच्यासमवेत हरयाणा येथीलच दोघेजण होते. गोव्यात कुंडई येथे हे जोडपे राहत होते, त्याची माहिती या महिलांच्या मूळ नवऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी त्यांना गाडीत कोंबून पळवण्याचा प्रकार केला, यासंबंधी म्हार्दोळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com