Arrest Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: बनावट उत्पन्न दाखला दिल्याप्रकरणी नगरसेवकासह दोघांना अटक; मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या सहीची बनवेगिरी उघड

Ponda councilor arrest: सिल्वानगर - फोंडा येथील सदानंद प्रभुगावकर याच्याकडे फोंडा पालिकेची हा बनावट स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला सापडला होता.

Sameer Panditrao

Ponda councilor fake signature document case

फोंडा: फोंडा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची खोटी सही करून उत्पन्नाचा दाखला दिल्याप्रकरणी फोंड्याचे नगरसेवक शिवानंद सावंत आणि दाखला ज्याच्या नावावर आहे, त्या सदानंद प्रभुगावकर या दोघांनाही फोंडा पोलिसांनी अटक केली. सदानंद प्रभुगावकर हा तिवरे - माशेल येथे राहतो. तीन आठवड्यांपूर्वी याप्रकरणी फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली होती.

सिल्वानगर - फोंडा येथील सदानंद प्रभुगावकर याच्याकडे फोंडा पालिकेची हा बनावट स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला सापडला होता. प्रभुगावकर याने आपल्या मुलीला गोमेकॉत परिचारिका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी हा उत्पन्नाचा दाखला घेतला होता. मात्र, अन्य दुसऱ्या कारणासाठी जेव्हा उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासली, तेव्हा हा पूर्वीचा दाखला पालिकेत दाखवण्यासाठी आणावा लागतो, त्यावेळी पालिका मुख्याधिकाऱ्याची बनावट सही करून परस्पर हा दाखला दिल्याची ही बनवेगिरी सापडली.

फोंडा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी फोंडा पोलिस स्थानकात या बनवेगिरीप्रकरणी १३ डिसेंंबरला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा करून पोलिसांनी १९ डिसेंबरला गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गोमेकॉ तसेच इतर संबंधितांकडे पोलिसांनी चौकशी केली; पण संशयित नगरसेवक शिवानंद सावंत आणि उत्पन्नाचा दाखला ज्याच्या नावावर आहे, त्या सदानंद प्रभुगावकर या दोघांनीही एकमेकांना बोटे दाखविली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.

दरम्यान, सदानंद प्रभुगावकर याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर नगरसेवक शिवानंद सावंत याला उद्या (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT