Ponda Municipal Council Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council Elections 2023: प्रभाग 15 ची अवस्था ‘असुनी नाथ, मी अनाथ’; विद्यमान नगरसेविका हॅट्ट्रिक साधणार ?

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

प्रभाग क्र. 15 हा फोंडा पालिकेतील शेवटचा प्रभाग. पण मागील निवडणुकीत असलेल्या आणि आताच्या पुनर्रचित प्रभागात बराच फरक आहे. पूर्वीचा जवळजवळ ७० टक्के भाग या प्रभागातून वगळला असून प्रभाग क्र. ९ मधला काही भाग तसेच पूर्वीच्या प्रभाग १० मधील काही भाग या प्रभागात आणला आहे.

शांतीनगर जंक्शन च्या विरुद्ध बाजूला असलेला भाग तेवढाच या प्रभागात पूर्ववत आहे. जोडतोड करून सध्याचा प्रभाग १५ बनविला गेला आहे. त्यामुळे या प्रभागाला सीमारेषा अशी नाहीच. हा प्रभाग कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो हे सांगणे यामुळेच कठीण झाले आहे. त्यामुळे ‘असूनी नाथ, मी अनाथ’ अशी या प्रभागाची सध्या अवस्था झाली आहे.

तळावलीकरांचे निवासस्थान ते मुख्य रस्त्यापर्यंत जाणाऱ्या शांतीनगरच्या या भागात अनेक आस्थापने तसेच सदनिका दिसतात. नव्याने भरभराटीला आलेला असा हा फोंडा शहरातील शांतीनगर मधला भाग आज उलाढालीचे प्रमुख केंद्र बनला आहे.

याशिवाय पूर्वी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये असलेला बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याचा भाग, एअरपोर्ट रोड, डॉक्टर कामत इस्पितळाच्या विरुद्ध बाजूला असलेला दुर्गाभाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा भाग, सुपरमार्केट येथील काही सदनिका अशी जोडतोड करून हा प्रभाग बनवला गेला आहे.

गेल्यावेळी या प्रभागात असलेले काही भाग आता दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आले आहेत. यामुळे या प्रभागाचा चेहरा मोहराच बदलल्यासारखा झाला आहे. गीताली तळावलीकर या प्रभाग १५ च्या नगरसेविका. नगराध्यक्ष बनलेल्या गीताली दोन वेळा निवडून आल्या आहेत. २०१३ साली प्रभाग दोन मधून तर २०१८ साली नव्यानेच अस्तित्वात आलेल्या प्रभाग १५ मधून त्या निवडून आल्या.

गेल्यावेळी डॉ. केतन भाटीकर यांच्या ‘रायझिंग फोंडा’ तर्फे रिंगणात उतरलेल्या तळावलीकर यांनी काँग्रेस पॅनेलतर्फे निवडणूक लढलेल्या माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांचा केवळ तीन मतांनी पराभव केला होता. आता खरे तर त्यांना हॅट्ट्रीकची चांगली संधी आहे. ‘एअरपोर्ट रोड’ हा महत्त्वाचा भाग असून काही वर्षांपूर्वी इथे चतुर्थी दिवाळीचा बाजार भरायचा. त्यामुळेच याला महत्त्व आले आहे.

थेट लढतीमुळे वाढली चुरस

गेल्या वेळेला या प्रभागात पंचरंगी लढत झाली होती. पण यावेळी हा प्रभाग महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे फक्त दोनच उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान नगरसेविका गीताली तळावलकर या फोंड्यातील प्रसिद्ध सनदी लेखापाल असून त्या पुन्हा ‘रायझिंग फोंडा’तर्फे रिंगणात उतरल्या आहेत.

त्यांचा सामना गतवेळी तीन मतांनी पराभूत झालेल्या माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची कन्या संपदा यांच्याशी होणार आहे. किशोर नाईक हे गेल्या वेळी काँग्रेसचे उमेदवार होते. पण यावेळी त्यांची कन्या भाजप पॅनेल तर्फे रिंगणात उतरली आहे. ‘वन टू वन’ अशी थेट असल्यामुळे चुरस वाढली आहे.

प्रभाग पुनर्रचनेचा निकषच कळेना !

या पुनर्रचित प्रभागाला सीमारेषाच नाही, आरोप विद्यमान नगरसेविका गीताली तळावलकर यांनी केला. नवरा एकीकडे तर बायको दुसरीकडे असे चित्रही काही ठिकाणी दिसते आहे. एक सदनिका एका प्रभागात तर त्याच कॉलनीतील इतर सदनिका दुसऱ्या प्रभागात असे प्रकारही बघायला मिळत आहेत,असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे मतदार गोंधळलेले असून याचा दोष ते आमच्यावर लादत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रभागाची पुनर्रचना करताना कोणता निकष लावला हे कळायला मार्ग नसल्याचेही त्या म्हणाल्या.

"वीजखांब बसवणे, पेव्हर्स घालणे, सरकारी योजना घरोघरी पोहोचवणे आदी कामे केली आहेत. या प्रभागात खुली जागा नसल्यामुळे म्हणावा तसा विकास करता आला नाही. पण आपण मतदारांशी संपर्क ठेवण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही."

-गीताली तळावलीकर, नगरसेविका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT