Ponda Municipal Council Election Result Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council Election Result: फोंड्यात रवीपुत्र विजयी! पालिका निवडणुकीत 'या' भाजप उमेदवारांची बाजी

आज (7 मे) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Kavya Powar

Ponda Municipal Council Election Result: फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल शुक्रवारी मतदान झाले. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले. त्यात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले. निवडणुकीवेळी सर्व उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ झाली. आज (7 मे) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये विजयी उमेदवारांची नावे समोर आली असून फोंड्यात भाजपने बाजी मारली आहे.

फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार :

वॉर्ड क्र. 1 : रॉय रवी नाईक

वॉर्ड क्र. 2 : विरेंद्र ढवळीकार

वॉर्ड क्र. 3 : ज्योती नाईक

वॉर्ड क्र. 4 : व्यंकटेश नाईक

वॉर्ड क्र. 5 : रितेश रवी नाईक

वॉर्ड क्र. 6 : शौनक विनायक बोरकर

वॉर्ड क्र. 7 : विश्वनाथ दळवी (बिनविरोध)

वॉर्ड क्र. 8 : प्रतीक्षा नाईक

वॉर्ड क्र. 9 : रुपक देसाई

वॉर्ड क्र. 10 : दीपा कोलवेकर

वॉर्ड क्र. 11 : वेदिका वळवईकर

वॉर्ड क्र. 12 : शिवानंद सावंत

वॉर्ड क्र. 13 : विध्या पुनाळेकर

वॉर्ड क्र. 14 : आनंद नाईक

वॉर्ड क्र. 15 : गिताली तळावलीकर

Ponda Municipal Council Election Result

मतमोजणीवेळी वॉर्ड क्र. 15 च्या उमेदवार गिताली तळावलीकर आणि संपदा नाईक यांना मिळालेल्या मतांमध्ये समानता असल्याने काही काळ या प्रभागाचा अंतिम निकाल रोखून ठेवण्यात आला होता. मात्र माहितीनुसार, वॉर्ड क्र. 15 मध्ये 402 मते समांतर झाल्याने निर्वाचन अधिकारी यांनी लॉट्समधून गीताली तळावलीकर यांना विजयी घोषित केले, तर संपदा नाईक यांना पराभव पत्करावा लागला.

फोंडा पालिकेचा निकाल पाहता, साखळी पालिकेप्रमाणे इथेही भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 15 जागांपैकी 10 जागांवर भाजप गटाचे उमेदवार निवडून आले आहेत, यामध्ये वॉर्ड क्र. 1, 2, 3, 5, 6, 7, 9, 10, 13 आणि 14 प्रभागांचा समावेश आहे. वॉर्ड क्र. 8, 11,12 आणि 15 मध्ये रायजिंग फोंडा गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर वॉर्ड क्र. 4 मधून अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

Goa Assembly Live: म्हादई अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय?

SCROLL FOR NEXT