Goa Politics: रवी नाईक  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘टेन्शन देनेका, लेनेका नही...’

रवी नाईक कधी कुणावर टपली मारतील सांगता यायचे नाही.

दैनिक गोमन्तक

रवी नाईक (Ravi Naik) यांचे भाषण (Speech) म्हणजे मिश्‍किलीच. रवी कधी कुणावर टपली मारतील सांगता यायचे नाही. तळावलीतील एका कार्यक्रमातही रवींनी मिश्‍किलीत भाषण केले आणि सभागृहात हास्याचे फवारे उडाले. रवींनी सांस्कृतिक, कला, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व स्तरांवर जवळपास पाऊणतास भाषण झोडले. पण वैताग कुणालाच आला नाही; कारण भाषणच मुळात मिश्‍किलीत होते. रवी स्वतःच सांगतात, माणसाने हसले पाहिजे, रडके तोंड घेऊन कशाला जगायचे. हसा आणि आयुष्य वाढवा असे सांगताना ‘टेन्शन देनेका, लेनेका नाही...’ असे सांगायलाही रवी विसरले नाहीत. (Ponda MLA Ravi Naik's speech is Mischievous)

दरम्यान गोव्यात मागील महिन्यात झालेल्या विधानसभा अधिवेशनात सरकारी नोंदीनुसार 1 लाख 32 हजार बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार‌‌ कसा मिळेल असा सवाल नाईक यांनी केली होता. गोव्यातील युवकांना रोजगार देणार कसा अशी विचारणाही फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी विधानसभेत केली होती.

विविध खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना, "नागरी पुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांना मामलेदारपदी बढती दिल्यास त्यांना कामकाज समजणार नाहीत.‌कुळ मुंडकार खटले कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. पेडण्यात कुळांची नावे गाळली गेली त्याची चौकशी करावी. 2016 पर्यंत 24 तास पाणी पुरवठा होणार होता त्याचे काय झाले," असे प्रश्न विचारून सरकारला निरूत्तर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT