Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: 'अतिक्रमण हटवा, अन्यथा आंदोलन छेडू'! फोंड्यातील व्यापारी, पदाधिकाऱ्यांची पालिकेवर धडक

Ponda Market: फोंडा बिझनेस फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक दिली खरी; पण पालिकेत कुणीच जबाबदार व्यक्ती नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : शहरात पदपथ अडवून मालविक्री करणाऱ्यांना हटवा, अन्यथा धरणे आंदोलन छेडू, असा इशारा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिला आहे.

पदपथ अडवणाऱ्या विक्रेत्यांमुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांना ग्राहक मिळत नाही, याचा जाब विचारण्यासाठी फोंडा वरचा बाजार, बुधवारपेठ मार्केटमधील व्यापारी आणि फोंडा बिझनेस फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक दिली खरी; पण पालिकेत कुणीच जबाबदार व्यक्ती नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.

आता सोमवारी १ डिसेंबरला हे सर्वजण पुन्हा पालिकेत जाणार आहेत. फोंडा शहर परिसरासह वरचा बाजार भागात फुटपाथ अडवून छोटे व्यापारी मालाची विक्री करतात. त्यामुळे ग्राहक मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी जात नाहीत. परिणामी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होतो. फोंड्यातील फुटपाथ मोकळे करा, या विक्रेत्यांना मार्केटमध्ये जागा द्या, अशी सातत्याने मागणी करूनही या अतिक्रमणकर्त्या विक्रेत्यांना पालिका किंवा पोलिस हटवत नाहीत.

मुख्यमंत्र्यांचा आदेश पण...

मासळी बाजार इमारत कमकुवत झाल्याने ही इमारत पाडून त्याजागी पालिका बाजार उभारण्यात येणार आहे. म्हणून या इमारतीमधील व्यापाऱ्यांचे स्थलांतर नवीन मार्केट संकुलात केले. त्यावेळी पालिका प्रतिनिधी, व्यापाऱ्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत एक बैठक झाली होती. त्यात व्यापाऱ्यांनी फुटपाथ मोकळे करा, फुटपाथवर बसणाऱ्यांना मार्केट संकुलात जागा द्या, अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले होते; पण दोन महिने झाले तरी अद्याप कार्यवाही होत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे सांगितले.

फोंडा बिझनेस फोरमचा पाठिंबा!

फोंडा बिझनेस फोरमने मार्केटमधील व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला असून मार्केटमधील व्यापाऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या हितासाठी आम्ही व्यापाऱ्यांना पाठिंबा दिल्याचे फोरमने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election Result 2025 Live Update: फेर मतमोजणीतून देखील भाजपच्या पदरी निराशा; दवर्लीत काँग्रेस उमेदवारच विजयी

Altinho Lyceum Complex: आल्तिनो येथील ऐतिहासिक लायसियम संकुल ‘जैसे थे’! मध्यस्थी केंद्र स्थापन करण्याची याचिका फेटाळली

Canacona: कृषी खात्याच्या प्रयत्नांना यश! काणकोणात वाढले भाजी पिकाचे क्षेत्र; प्रायोगिक तत्त्वावर 12 शेतकऱ्यांना फायदा

Christmas In Goa: गोव्यात पूर्वी 'ख्रिसमस'चे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी गाव एकत्र येत असे, कडाक्याच्या थंडीतील परिचित उब

Oldest Christmas Tree: 1441 मध्ये उभारलेला युरोपातील पहिला 'ख्रिसमस ट्री', एस्टोनियाची राजधानी, टॅलिनमधील खास नाताळ

SCROLL FOR NEXT