Ponda Market Fire Dainik Gomantak
गोवा

Ponda Market Fire: फोंडा बाजारात आग; तीन गाळे खाक, 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान

Ponda Market: वरचा बाजार, फोंड्यातील बुधवारपेठ भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी उत्तररात्री आग लागून तीन गाळे जळून खाक झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: वरचा बाजार, फोंड्यातील बुधवारपेठ भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी उत्तररात्री आग लागून तीन गाळे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

आग लागल्याची माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग संपूर्ण मार्केटमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले. भाजीच्या दुकानांतील लाकडी फळ्या व गोणपाटामुळे आग वेगाने भडकल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फोंडा नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, माजी नगराध्यक्ष रितेश नाईक, विश्वनाथ दळवी तसेच काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT